भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी मोठी घडामोड, सेवादार विनायक आणि तरुणीसह तिघांना अटक

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी मोठी घडामोड, सेवादार विनायक आणि तरुणीसह तिघांना अटक

भय्यूजींचा विश्वासू सेवादार विनायक पोलिसांना शरण आल्यानंतर घडामोडींना वेग आला होता

  • Share this:

विकाससिंग चौहान,प्रतिनिधी

इंदूर, 18 जानेवारी : आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. यामध्ये भय्यू महाराज यांचा विश्वासू सेवादार विनायक दुधाडे आणि ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीचाही समावेश आहे.

भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणी 30 डिसेंबर 2018 रोजी भय्यूजींचा विश्वासू सेवादार विनायक पोलिसांना शरण आल्यानंतर घडामोडींना वेग आला होता. विनायकच्या पाठोपाठ भय्यूजींना ब्लॅकमेल करणारी तरुणीही पोलिसांसमोर हजर झाली.

अखेर दोन आठवड्याच्या चौकशीनंतर तेजाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम 306 ,120 बी, आणि 384 अंतर्गत संशयित महिलेसह सेवादार विनायक आणि शरदला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या तरुणीने भय्यू महाराजांवर लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता.'

काय आहे प्रकरण?

पन्नास वर्षांच्या भय्यू महाराजांनी 12 जून 2018 ला आपल्या निवासस्थानी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. हे आत्महत्येचं प्रकरण आहे असं समजून पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर प्रकरण बंद करण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांचा ड्रायव्हर कैलास पाटील उर्फ भाऊ याला निवेश बडजात्या या वकिलांकडे पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्याने चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले. आश्रमातले काही लोक महाराजांना ब्लॅकमेल करत होते, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली होती. त्यानंतर भय्यूजींचा सेवादार पोलिसांसमोर हजर झाल्यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं.

================

First published: January 18, 2019, 7:52 PM IST

ताज्या बातम्या