'भाईं'च्या भूमिकेत दिसणार दोन अभिनेते

'भाईं'च्या भूमिकेत दिसणार दोन अभिनेते

वायाकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'भाई – व्यक्ती की वल्ली' या चित्रपटाचा टीझर काल प्रेक्षकांच्या भेटीस आला. ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

  • Share this:

विराज मुळे, प्रतिनिधी

मुंबई, 9 नोव्हेंबर : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे.  त्यांचं व्यक्तिचित्रण किती खुसखुशीत असू शकतं, कथेतील  प्रत्येक पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात, हे ज्यांच्या लिखाणशैलीतून कळतं. लिखाणाची शैली अशी अतरंगी की त्या व्यक्तीच्या प्रेमात माणूस पडतो.  हास्य आणि व्यंग यांचा अलौकिक ताळमेळ म्हणजे ही व्यक्ती. लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे खऱ्या अर्थाने  महाराष्ट्राचं भूषण होतं.

ज्यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच  नाटकं, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता खुद्द त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके पु.ल.देशपांडे. वायाकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'भाई – व्यक्ती की वल्ली'  या चित्रपटाचा टीझर काल प्रेक्षकांच्या भेटीस आला. ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे, तर पटकथा गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांचे आहेत, संगीत अजित परब यांचं आहे.

चित्रपटात पुलंची भूमिका सागर देशमुख साकारणार आहे.इरावती हर्षे हिने सुनीता बाईंची भूमिका साकारली आहे.पण सागर उमेदीच्या काळातले पुलं दाखवणार, तर सूत्रांच्या माहितीनुसार वयोवृद्ध पुलं साकारणार आहेत विजय केंकरे. आणि वृद्ध सुनीताबाई उभ्या करणार आहेत शुभांगी दामले. हा सिनेमा 4 जानेवारी 2019ला रिलीज होणार आहे.

टीझर लाँचच्या सोहळ्यास मोशन निखिल साने व्यवसाय प्रमुख, मराठी एंटरटेनमेंट वायाकॉम18, महेश मांजरेकर, सागर देशमुख, इरावती हर्षे, दलिप ताहिल, शिवाजी साटम, सचिन खेडेकर, सुनील बर्वे, अभिजित देशपांडे, पूजा सावंत, अंकुश चौधरी, प्रिया बापट इ. हजर होते.

First Published: Nov 9, 2018 03:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading