पंकजा समर्थकांची भगवान गडावर मेळाव्याची हाक, नामदेव शास्त्रींचा पुन्हा विरोध

पंकजा समर्थकांची भगवान गडावर मेळाव्याची हाक, नामदेव शास्त्रींचा पुन्हा विरोध

भगवान गडावरील पंकजा समर्थक विरूद्ध महंत नामदेव शास्त्री यांच्यात पुन्हा संघर्ष निर्माण झालाय.

  • Share this:

29 ऑगस्ट : भगवान गडावरील पंकजा समर्थक विरूद्ध महंत नामदेव शास्त्री यांच्यात पुन्हा संघर्ष निर्माण झालाय. यावेळी निमित्त आहे वंजारी समाजाच्या आरक्षण मेळाव्याचं. मुंडे समर्थक फुलचंद कराड यांनी येत्या 31 ऑगस्टला वंजारी समाजाला वाढीव आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मेळावा घेण्याचं जाहीर केलंय, पण भगवानडाचे महंत नामदेव शास्त्रींनी या मेळाव्याला विरोध केलाय. तसं पत्रच त्यांनी जिल्हा प्रशासनाला पाठवलंय. त्यामुळे या वादात प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे मुंडे आणि शास्त्री समर्थकांचं लक्षं लागलंय.

या आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री पुन्हा आमने-सामने आले आहेत. मराठा धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्यांवर रान पेडविले आहे. त्यात आता वंजारी समाजानेही उडी घवतली आहे. या निमित्ताने पंकजा मुंडे समर्थक असलेले फुलचंद कराड यांनी भगवान गडावर 31 ऑगस्टला मेळावा जाहीर केला. पण भगवानगडाचे महंत यांनी कर्यक्रमाला विरोध केला.

यासाठी त्यांनी पात्र पाथर्डी शेवंगावचे उप पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठविले आहे. कुठल्याही राजकीय कार्यक्रम गडावर घेण्यास म्हणतांचा विरोध आहे. त्यामुळे भगवान गडावरून पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री असा वाद पेटताना दिसणार आहे.

याआधीही भगवानगडावर दसरा मेळाव्यावरुन राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे मठाधिपती महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्यात वाद आहे. नामदेव शास्त्रींनी गडावर मेळाव्याला परवानगी देऊ नये अशी भूमिका घेतली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच भूमिका घेत भावनिक साद घातली होती. "मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा" काही नको फक्त 20 मिनिटं वेळ द्या अशी मागणी त्यावेळी पंकजा मुंडे यांनी केली होती.

 

आपल्या एसबीआय अकाऊंटच्या या ६ गोष्टी कोणालाही सांगू नका...

First published: August 29, 2018, 11:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading