आता टीव्ही मालिका ‘भाभी जी...’ च्या माध्यमातून पंतप्रधान मोदीचं उघड प्रमोशन?

आता टीव्ही मालिका ‘भाभी जी...’ च्या माध्यमातून पंतप्रधान मोदीचं उघड प्रमोशन?

निवडणुकीच्या काळात सध्या सर्व राजकीय पक्ष आपल्या अंदाजात लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • Share this:

मुंबई, ०७ एप्रिल- निवडणुकीच्या काळात सध्या सर्व राजकीय पक्ष आपल्या अंदाजात लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीय पक्ष जनतेपर्यंत आपला संदेश पोहोचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. दरम्यान 'भाभीजी घर पर है' या टीव्हीवरच्या सर्वात प्रसिद्ध मालिकेमध्येही सरकारच्या योजनांचा प्रचार करताना पाहण्यात आलं.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात मनमोहन तिवारी अन्य कलाकारांना स्वच्छतेचं महत्त्व सांगताना दिसतात. त्यानंतर ते म्हणतात की, ‘तुम्ही सर्वांनी कानपूर शहर अस्वच्छ केलं आहे. तुम्हाला माहीत आहे का काही वर्षांपूर्वी स्वच्छता अभियान सुरू झालं होतं तेव्हा जागरुकता नसल्यामुळे हे अभियान ठप्प झालं होतं. पण आज एका कर्मठ नेत्यामुळे हे अभियान पुन्हा सुरू झालं आहे. आतापर्यंत ९ कोटींपेक्षा जास्त शौचालय बांधण्यात आले आहेत. आता लोकांना उघड्यावर शौच करण्याची गरज नाही. आजचं सरकार पूर्ण प्रयत्नांनी एकता आणि अखंडतेला धोका पोहोचणार नाही यासाठी काम करत आहे. आपण स्वच्छता अभियानाच्या गोष्टी करतो आहोत पण एक कर्मठ आणि अतुल्य पुरुषामुळे आपण स्वच्छ वातावरणात श्वास घेऊ शकत आहोत.’

टीव्ही मालिका 'भाभी जी घर पर है'च्या गुरुवारच्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्ज्वला गॅस योजनेबद्दलही प्रचार करण्यात आला. यात अंगुरी भाभी कशाप्रकारे ५ कोटी कुटुंबांना या योजनेचा फायदा झाला आणि एक लाख लोकांना रोजगार मिळाला याबद्दल सांगताना दिसते.

सोशल मीडियावर अनेक युजर्सनी हे पेड प्रमोशन असल्याचं म्हटलं आहे. या मालिकेत नाव न घेता सध्याच्या सरकारचं प्रमोशन केलं जात आहे असंही अनेकांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकच्या प्रदर्शनावरून सध्या वाद सुरू आहेत. काँग्रेस पक्षाने सिनेमाच्या प्रदर्शनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाच्या मते, अशा प्रकारचे सिनेमे निवडणुकांच्या काळात प्रदर्शित करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे.

VIDEO : आम्ही काय शिवाजी महाराजांच्या नावानं मत मागतो का? उदयनराजेंचा सवाल

First published: April 7, 2019, 6:41 PM IST

ताज्या बातम्या