माधवी जुवेकरला 'नागीण डान्स' भोवणार, बेस्ट प्रशासनाकडून नोटीस

माधवी जुवेकरला 'नागीण डान्स' भोवणार, बेस्ट प्रशासनाकडून नोटीस

बेस्ट कर्मचारी आणि कॉमेडी अभिनेत्री माधवी जुवेकरला 'नागीण डान्स' चांगलाच महागात पडलाय, बेस्ट प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, दौलतजादा नागीण डान्स करणाऱ्या 11 कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रशासनानो नोटीसा पाठवल्यात. बेस्टची कर्मचारी असलेली माधवी जुवेकर हिला देखील नोटीस धाडण्यात आलीय.

  • Share this:

मुंबई, 09 नोव्हेंबर : बेस्ट कर्मचारी आणि कॉमेडी अभिनेत्री माधवी जुवेकरला 'नागीण डान्स' चांगलाच महागात पडलाय, बेस्ट प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, दौलतजादा नागीण डान्स करणाऱ्या 11 कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रशासनानो नोटीसा पाठवल्यात. बेस्टची कर्मचारी असलेली माधवी जुवेकर हिला देखील नोटीस धाडण्यात आलीय. बेस्ट विभागीय अधिकाऱ्याकडून ही नोटीस पाठवण्यात आलंय, या नोटीसीला या कर्मचाऱ्यांना उत्तर द्यावे लागणार आहे.

अभिनेत्री माधवी जुवेकर हिचा नोटा उधळतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. यात माधवी ही एका महिलेसोबत 'नागीण डान्स' करताना दिसतेय. 'बेस्ट'च्या वडाळा आगारात दसऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. कॉमेडी एक्सप्रेस आणि अनेक नाटकांमध्ये काम केलेली माधवी ही बेस्टची कर्मचारी देखील आहे.

'बेस्ट'च्या एफ साऊथ कस्टमर केअर विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दसऱ्याच्या दिवशी माधवीच्या नागीण डान्सवर बेस्ट कर्मचाऱ्यांनी नोटा उधळल्या होत्या. या कार्यक्रमात माधवीने केलेल्या आक्षेपार्ह डान्सबद्दल संताप व्यक्त होतोय. एकीकडे पगार वेळेत मिळत नाही अशी तक्रार बेस्ट कर्मचाऱ्यांकडून केली जात असताना नेमका नोटबंदीच्या वर्षपूर्तीच्या दिवशीच हा व्हिडिओ व्हायरल झाला होता, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या उधळपट्टीवर समाजाच्या सर्वच थरातून तीव्र टीका झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2017 06:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading