मुंबई, 31 जुलै : मुंबईतील माटुंगा परिसरात बेस्ट बसला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलांनी आग आटोक्यात आणली आहे. वरळी डेपोतील २७ क्रमांकाची बस मुलुंडकडून वरळीकडे माहेश्वरी उद्यान ब्रिजवरून जात असताना दुपारी ४.३० वाजता बस ड्रायव्हरच्या केबीनमध्ये इलेक्ट्रिक बोर्डला आग लागली.