पोलिसांनी केला ZUMBA, व्हिडीओ पाहून तुम्हीही थिरकाल !

पोलिसांनी केला ZUMBA, व्हिडीओ पाहून तुम्हीही थिरकाल !

तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं ताण दुर करण्यासाठी योगा, झुंबा (Zumba) यांचा आधार घेतला जातो. मग हिच शक्कल आता बंगळुरू पोलिसांनी देखील केली आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 23 फेब्रुवारी : सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस प्रशासन नेहमीच सज्ज असतं. नागरिकांची मदत करण्यासाठी त्यांना फिट राहणं आवश्यक आहे. मात्र 24 तास ऑन ड्युटी असणाऱ्या या पोलिसांना मोठ्या प्रमाणात मानसिक ताणाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. यावर बेंगळुरू पोलिसांनी एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे.

तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं ताण दुर करण्यासाठी योगा, झुंबा (Zumba) यांचा आधार घेतला जातो. मग हिच शक्कल आता बंगळुरू पोलिसांनी देखील केली आहे. पोलिसांना येणारा मानसिक ताण घालवण्यासाठी त्यांनी झुंबा प्रशिक्षण शिबीराचं आयोजन केलं होतं. बेंगळुरू पोलिसांचा अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. रिदमिक स्ट्रेस बस्टर प्रोग्राम या नावाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यामध्ये सर्व पोलीस मोठ्या उत्साहाने झुंबाचं प्रशिक्षण घेताना दिसले.

जवळपास 4 हजार युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला असून खूप कमेंट्स देखील आल्या आहेत. पोलिसांचा हा व्हिडीओ पुश-अप्स करताना सुरू होतो आणि त्यांनतर येणाऱ्या डान्सिंग पोलिंसांना पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. दाक्षिणात्य गाण्यावर थिरकणाऱ्या पोलिसांना पाहून तुम्हाला डान्स करण्याची इच्छा नक्की होईल.

झुंबा येत नसूनही आपापल्या पद्धतीने गाण्याच्या तालावर थिरकणाऱ्या पोलिसांना पाहून तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याशिवाय राहणार नाही.

First published: February 23, 2020, 9:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading