बडीशेपचं पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

ज्या लोकांमध्ये आयन आणि पॉटॅशियमची कमतरता असते त्यांना बडीशेप खाण्याचा सल्ला दिला जातो.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 06:55 AM IST

बडीशेपचं पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

स्वयंपाक घरातील मसाल्यांच्या डब्यातले मसाले फक्त जेवणाची चवच वाढवत नाहीत तर आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहेत. अशाच या मसाल्यांपैकी उपयोगी मसाला म्हणजे बडीशेप. जेवण झाल्यानंतर अनेकजण बडीशेप खाण्याला प्राधान्य देतात. तर अनेकजण गोड बडीशेप खातात. यामुळे गोड खाण्याचा आनंद मिळतो आणि बडीशेप आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ज्या लोकांमध्ये आयन आणि पॉटॅशियमची कमतरता असते त्यांना बडीशेप खाण्याचा सल्ला दिला जातो. बडीशेपचे अजून काही फायदे जाणून घेऊ...

अनियमित पाळीही होते नियमित- ज्या महिला अनियमित पाळीच्या समस्यांना सामोरे जातात, त्यांनी रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा बडीशेप टाकून प्यावं.

अजूनही अनेक गुण- याशिवाय बडीशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, आयन, पोटॅशियम यांसारखे गुण असतात.

पोटाचे विकार होतात दूर- बडीशेपमुळे पोटाचे अनेक विकार दूर होतात. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा विकार असतो त्यांनी बडीशेप खावी. यामुळे हा त्रास दूर होऊ शकतो.

डोळ्यांसाठी फायदेशीर- बडीशेप नियमित खालली तर दृष्टी चांगली होते. रोज जेवून झाल्यानंतर एक चमचा बडीशेप खा. याशिवाय अर्धा चमचा बडीशेपची पूड, एक चमचा खडीसाखरसोबत दूधात घालून प्या. यामुळे दृष्टी सुधारेल.

Loading...

अपचन होतं दूर- लहान मुलांना अनेकदा अपचनाचे त्रास होतात. यावर बडीशेप हा एक रामबाण उपाय आहे. दोन चमचे बडीशेप पाण्यात उकळून घ्या. बडीशेप चतुर्थांश शिल्लक राहील तेव्हा ती गाळून थंड करून वापरा.  रोज दोन ते तीन चमचे खा. पोटदुखी आणि अपचनच्या तक्रारी होणार नाहीत.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिसतात ही लक्षणं, एकगा तुम्हीही वाचा!

Sawan 2019: ...म्हणून श्रावणात महिला हिरव्या रंगाचे कपडे घालतात

उशीरापर्यंत रात्री जागायची सवय आहे तर वेळीच व्हा सावध!

रेड मीट खाल्याने महिलांमध्ये वाढतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका!

VIDEO: आगमनाआधीच बाप्पा पाण्यात, मनाला चटका लावणारं गणपती कारखान्याचं दृष्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 06:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...