भाषण केलं म्हणून काँग्रेसच्या 'या' राहुलची कापली जीभ

भाषण केलं म्हणून काँग्रेसच्या 'या' राहुलची कापली जीभ

काँग्रेस उमेदवार रविंद्र चौबे यांच्या समर्थनार्थ भाषण दिल्यामुळे चक्क एका युवा काँग्रेसचा स्थानिक नेता राहुल दानी याची जीभ कापण्यात आली आहे.

  • Share this:

छत्तीसगड, 05 नोव्हेंबर: छत्तीसगडमध्ये बेमतरा जिल्ह्याच्या साजा विधानसभेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. काँग्रेस उमेदवार रविंद्र चौबे यांच्या समर्थनार्थ भाषण दिल्यामुळे चक्क एका युवा काँग्रेसचा स्थानिक नेता राहुल दानी याची जीभ कापण्यात आली आहे.

जीभ कापली गेल्यामुळे राहुलला गंभीर अवस्थेमध्ये भिलाईच्या नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे राहुलची सर्जरी करण्यात आली आहे. पण या सगळ्या धक्कादायक घटनेनंतर राहुल कोमामध्ये गेला आहे.

निवडणुकांच्या सभेदरम्यान युवा काँग्रेस नेत्याला भाषण देणं चांगलच महागात पडलं आहे. ही घटना 31 ऑक्टोबरची आहे. जेव्हा धमधामध्ये युवा काँग्रेस कार्यकर्ता संमेलनात भाषण केल्यानंतर राहुल दानी जेवण करण्यासाठी जात होते. त्यात अज्ञातांनी त्यांचा ताफा अडवला. त्यांना गाडीबाहेर काढत, त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर जीभ कापून रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत फेकून निघून गेले.

या मारहाणीनंतर त्यांना तात्काळ नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही अज्ञात आले. मला मारहाण केली आणि मरणासन्न अवस्थेत मला फेकून गेल्याची कबुली रोहुल यांनी पोलिसांना दिली आहे. तीन दिन कोमामध्ये राहिल्यानंतर सोमवारी सकाळच्या सुमारास राहुल यांना जाग आली आहे.

'तुला भाषण देण्याचा खूप हौस आहे ना, आता तुझी जीभच कापतो थांब' असं ते हल्लेखोर म्हणत असल्याचंही त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितलं आहे. पण या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाले आहेत. पण या संदर्भात अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा केला नसल्याचं सांगण्यात येत आहे.

VIDEO : नाशिकमध्ये धक्कादायक अपघात, भल्या मोठ्या ट्रकची थेट टॅक्सीला धडक

First published: November 5, 2018, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading