S M L

पंतप्रधानांची चुप्पी : मोदींनी नाही दिलं 'या' प्रश्नाचं उत्तर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. पण तीन राज्य भाजपच्या हातातून जात असताना पंतप्रधानांनी याविषयी मौन बाळगणंच पसंत केलं. कशी होती पंतप्रधानांची बदललेली देहबोली?

Updated On: Dec 11, 2018 11:01 AM IST

पंतप्रधानांची चुप्पी : मोदींनी नाही दिलं 'या' प्रश्नाचं उत्तर

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : दिल्लीत आजपासूनच संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला जाण्यापूर्वी नरेंद्र मोदी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत असताना पंतप्रधान याविषयी बोलतील असा अंदाज होता. पण तीन राज्य भाजपच्या हातातून जात असताना पंतप्रधानांनी याविषयी मौन बाळगणंच पसंत केलं.

संसदीय अधिवेशनाविषयी बोलल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी मोदींना विधानसभा निकालांविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण पंतप्रधान याविषयी काहीच न बोलता निघून गेले.

हे सत्र महत्त्वपूर्ण


हे सत्र महत्त्वपूर्ण आहे. यात काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणं अपेक्षित आहे.जास्तीत जास्त जनहिताची कामं मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल.सर्वच संसद सदस्यांचं याबाबत एकमत असेल. सदनातले सगळे सदस्य या भावनेशी एकमत असतीलच,असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

भाषा झाली सौम्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देहबोली आज तुलनेनं सौम्य वाटत होती. नेहमीच्या आक्रमक शैलीत सुरुवात करण्याऐवजी त्यांनी संवादाची भाषा सुरू केली. सर्व विषयांवर चर्चा व्हायला हवी. वाद, प्रतिवाद, वादावादी तर होईलच, पण मूळात संवादाला जागा हवी. चर्चा तर होणारच, याबाबत आमचा आग्रह असेल. असा भावार्थ मोदी यांच्या वक्तव्याचा होता. सदनाचा जास्तीत जास्त वेळ जनहितासाठी खर्च व्हावा, दलहितासाठी नाही, असंही मोदी शेवटी म्हणाले.

Loading...

VIDEO : नगरमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार, गाड्यांची तोडफोड


<iframe class="video-iframe-bg-color" onload="resizeIframe(this)" id="story-322977" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzIyOTc3/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 11:01 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close