नागपूर,22 फेब्रुवारी: भीम आर्मी संघटनेचे प्रमुख अॅड.चंद्रशेखर आझाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांना त्यांच्या होमपिच अर्थात नागपुरात जाऊन त्यांनी खुले आव्हान दिले आहे. संघप्रमुखांनी मैदानात येऊन निवडणूक लढवावी, लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन निवडणूक लढवू नये', असे चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले आहे. नागपूरमधील भीम आर्मी कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रशेखर आझाद बोलत होते.
हातात तिरंगा घेऊन आले व्यासपीठावर..
चंद्रशेखर आझाद सुरुवातीला हातात तिरंगा घेऊन मंचावर आले. यानंतर त्यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून आपल्या भाषणाला सुरुवात केली. न्यायालय मोठी ताकद आहे. जनतेला वाटलं म्हणून आजचा मेळावा शक्य झाला. तिरंगा सर्वत्र फडकणार, हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं, असं म्हणत त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकासह भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली.
'मी माझे शब्द मागे घेतो', वादाच्या 48 तासानंतर अखेर वारीस पठाण नमले
देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लोकांचा सन्मान ठेवावा, तेव्हाच माझ्याकडून सन्मानाची अपेक्षा करावी. देश कुणाच्या बापाचा नाही. इथे दोन विचारांचा संघर्ष आहे, (हेडगेवार स्मारकाकडे बोट दाखवत) हे मनपुस्मृती मानतात. आम्ही संविधान मानतो, असे सांगितले.
दलित, शिख आर्मिक अल्पसंख्याकांना वेगळं करणं हे षडयंत्र आहे. सीएए-एनआरसी त्याचाच एक भाग आहे. कितीही लाठ्या मारल्या तरीही आम्ही देशाला वाचवण्यासाठी पुढे येणार आहे. आम्ही आठ तास मागितले पण न्यायालयाने मेळाव्याला तीन तास दिले, पण तीन तास पुरेसे आहे. असेही आझाद म्हणाले.
संघावर बंदी येईल तेव्हा...
चंद्रशेखर आझाद म्हणाले, संघावर बंदी येईल तेव्हाच मनूवाद संपेल. त्यांनी इंग्रजांसमोर माफी मागीतली ते महापुरूष नाही. मोहन भागवत म्हणत होते वाद व्हायला पाहिजे आरक्षणावर, तेव्हा त्यांनी यावं आणि डिबेट करावं आरक्षणाबाबत. संघप्रमुखांनी मैदानात येवून निवडणूक लढवावी. लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणूक लढवू नये, स्वत: मैदानात यावं, आमचा पंतप्रधान पण येणार आणि बऱ्याच राज्यात सरकार येणार, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
बारावीचा पेपर सुरू असताना WhatsApp वर फोडली प्रश्नपत्रिका, दोन शिक्षक ताब्यात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur news