Home /News /news /

लॉकडाऊनमध्ये शिवभोजन थाळी बंद, नागरिकांची मदत सोडून शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये राजकारण

लॉकडाऊनमध्ये शिवभोजन थाळी बंद, नागरिकांची मदत सोडून शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये राजकारण

शिवभोजन थाळी केंद्राच्या माध्यमातून 150 गरजूंना मोफत जेवण दिले जात होते, मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी तक्रार केल्यामुळे कुठली ही शहानिशा न करता प्रशासनाने 4 एप्रिला स्थगितीचा आदेश दिला

बीड, 06 एप्रिल : आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, अशी हात जोडून विनंती शिवसेना बीड जिल्हाप्रमुखांनी केली असल्याचं सांगण्यात येत आहे. याचं कारण म्हणजे शिवभोजन थाळी केंद्राच्या माध्यमातून 150 गरजूंना मोफत जेवण दिले जात होते, मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी तक्रार केल्यामुळे कुठली ही शहानिशा न करता प्रशासनाने 4 एप्रिला स्थगितीचा आदेश दिला. त्यामुळे झोपडपट्टीवरील गरजू 150 कुटुंबातील लोकांना जेवण मिळाले नाही. म्हणून संतपलेल्या जिल्हा प्रमुखाने 'आमदारसाहेब एवढया खालच्या पातळीचे राजकारण करू नका. गरीब लोकांच्या तोंडाचा घास काढू नका. आम्ही आमच्या पध्दतीने काम करतोय. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. हात जोडतो खुनशी राजकरण थांबवा' अशी विनंती केल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने आली आहे. बीड जिल्हयात कोरोनाव्हायरस पेक्षा राजकारनाच्या व्हायरसची चर्चा जोरात सुरू आहे. राज्यात सत्तेत सहभागी असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये क्षुल्लक गोष्टीवरून हमरी-तुमरी सुरू आहे. एकमेकांच्या तक्रारी करत उणेदुणे काढले जात आहे. असं असताना चक्क शिवसेनेच्या कार्यकर्त्याचे शिवभोजन थाळी केंद्र बंद केल्याने वाद चव्हाट्यावर आला आहे. हे वाचा - लॉकडाऊन संपल्यानंतरही बंदी राहणार कायम, हा आहे सरकारचा पुढचा प्लान बीड शहरात महात्मा बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शिवभोजन थाळी केंद सुरू होते. मात्र, लॉकडाऊन केल्यानंतर 1 तारखेला 75 थाळीची परवानगी असताना संस्थाचालक सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून 200 थाळी गरजू झोपडपट्टीवरील मजुरांना, हातावर पोट असणाऱ्यांना वाटप केले जात होते. पण अचानक हा या केंद्राला स्थगिती दिल्याने जेवण बंद झाले. आमची लहान मुले उपाशी आहेत असं या महिला सांगत आहेत. हे वाचा - कोरोनामुळे माणुसकीची हरपली, पतीच्या अंत्यसंस्काराला गावकऱ्यांनी दिला नकार अखेर.. अशा आपत्कालीन स्थितीमध्ये राजकारण करण्यापेक्षा एकमेकांच्या हातात हात घालून गरजूंना मदत करणे गरजेचे असताना राष्ट्रवादीच्या आमदारांकडून जाणीवपूर्वक महात्मा सेवाभावी संस्थेचे शिवभजन केंद्र बंद करण्याचे खोटी तक्रार देण्यात आली असा आरोप करण्यात आला आहे. कुठलीही शहानिशा न करता प्रशासनाने हिशोब उन्हाळी बंद केल्यामुळे गोरगरीब लोकांवर अन्याय झाला आहे असे मत महात्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दिलीप भोसले यांनी व्यक्त केले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. यामध्ये आम्ही कुठलेही राजकारण केले नाही असेही फोनवरून सांगितले. त्यामुळे खरं काहीही असलं तरी यामध्ये सामान्य नागरिक भरडला जात आहे. हे वाचा - VIDEO : डॉक्टर महिलेसोबत गंभीर प्रकार, कोरोनाच्यामुळे शेजाऱ्यांनी केली शिवीगाळ
Published by:Manoj Khandekar
First published:

पुढील बातम्या