मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

फक्त परळीचं वैद्यनाथच नाही तर 100 देवस्थानांना बॉम्बने उडविण्याची धमकी? धक्कादायक माहिती उघड

फक्त परळीचं वैद्यनाथच नाही तर 100 देवस्थानांना बॉम्बने उडविण्याची धमकी? धक्कादायक माहिती उघड

बीड (Beed) जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर (Parli Vaidyanath Jyotirlinga temple) आरडीएक्सने (RDX) उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर (Parli Vaidyanath Jyotirlinga temple) आरडीएक्सने (RDX) उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर (Parli Vaidyanath Jyotirlinga temple) आरडीएक्सने (RDX) उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

बीड, 30 नोव्हेंबर : बीड (Beed) जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर (Parli Vaidyanath Jyotirlinga temple) आरडीएक्सने (RDX) उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी (Police) दोन दिवसांपूर्वी या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. या आरोपींच्या नावानेच धमकीचे पत्र आले होते. पण पोलिसांनी जेव्हा त्यांची चौकशी केली तेव्हा त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंदिर समितीच्या विश्वस्तांना धमकीचे पत्र पाठवणारे दुसरे कुणीतरी आहेत, असा अंदाज बांधला जातोय. पोलिसांनी ज्यांना अटक केलीय, त्यांच्या नावाने धमकीचे पत्र आले होते. पण त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपी हे दुसरेच कोणतरी असल्याचा दावा केला आहे. तसेच खऱ्या आरोपींनी तब्बल 100 देवस्थानांना आपल्या नावे धमकीचे पत्र पाठवल्याची माहिती अटकेतील आरोपींनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे आता पोलीसही चक्रावले आहेत.

जमिनीच्या वादातून धमकीचे पत्र

अटकेत असलेल्या आरोपींनी हा सगळा प्रकार जमिनीच्या वादातून करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यांच्यासोबत ज्यांनी जमिनीच्या वाद घातला त्या प्रतिवाद्यांनी हा सगळा प्रकार आपल्या नावाने केल्याचा दावा अटकेतल्या आरोपींनी केला आहे. विशेष म्हणजे त्या आरोपींनी जवळपास 100 देवस्थानांना अशाप्रकारे धमकीचे पत्र पाठवलेल्या अटकेतील दोघांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास आम्ही करत आहोत, अशी माहिती पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी दिली आहे. दरम्यान तो प्रतिवादी कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : नागपूर हत्याकांडाचा उलगडा; नातवानेच हात बांधून चिरला गळा, कारण ऐकून व्हाल हैराण

नेमकं प्रकरण काय?

12 ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेश देशमुख हे सचिव आहेत. त्यांना शुक्रवारी एक पत्र मिळाले होते. ज्यामध्ये वैद्यनाथ मंदिर संस्थानकडे खूप पैसे आले आहेत. 50 लाख रुपये द्या अन्यथा आर.डी.एक्सने मंदिर उडवून देवू असा मजकूर लिहलेला आहे. त्यावर मोबाईल नंबर व नाव आहे. रतनसिंग रामसिंग दख्खणे अशी धमकी देणाऱ्या गुंडाचे नाव आहे.

हेही वाचा-  Breaking News: मुंबईत उद्यापासून सुरु होणार नाहीत शाळा, आयुक्तांनी दिली नवी तारीख

'मी फार मोठा नामी गुंड आहे व ड्रग माफिया असून गावठी पिस्तूल धारक आहे. मला माझ्या तातडीची गरज भागवण्यासाठी आपल्या मंदिर संस्थांकडून 50 लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच आपण मला वरील रक्कम माझ्या खालील पत्त्यावर ताबडतोब पोस्ट करावी, नसता आपले मंदिर संस्थान माझ्याकडील आरडीएक्स उडवून लावेल, अशी धमकीच या गुंडाने दिली. या पत्रामुळे खळबळ उडाली होती अखेरीस मंदिर समिती आणि विश्वस्त यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून मंदिराला अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केली.

First published: