• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • Beed : आता मुक्या जनावरावरांवरही साथीच्या आजाराचं संकट, घटसर्प, थायरेलेलीसने 150 जनावरांचा मृत्यू

Beed : आता मुक्या जनावरावरांवरही साथीच्या आजाराचं संकट, घटसर्प, थायरेलेलीसने 150 जनावरांचा मृत्यू

50 animal died in beed आधीच लोक कोरोनाच्या संकटानं हैराण असताना मुक्या जनावरांवर संकट ओढावल्यानं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. लाख मोलाची दुभती जनावरं मरू लागल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे.

 • Share this:
  बीड, 29 मे : जिल्ह्यातील आष्टी (Beed Ashti) तालुक्यात घटसर्प, थायरेलेलीस सदृश्य साथीच्या आजाराने थैमान (Beed Animal Dieses news) घातलं आहे. या आजारामुळं 150 जनावरांचा मृत्यू (150 animal died in beed) झाला आहे. त्यामुळं आधीच लोक कोरोनाच्या संकटानं हैराण असताना मुक्या जनावरांवर संकट ओढावल्यानं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. लाख मोलाची दुभती जनावरं मरू लागल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. (वाचा-Covid रुग्णालयातून बायकोचं तर विलगीकरण कक्षातून नवऱ्याचं पलायन, 4 तासांनी सापडले) आष्टी तालुक्यातील तवलवाडी वाळुंज परिसरात 70 दुभत्या गाई आणि 80 वासरं मृत्यूमुखी पडली आहेत. साथीच्या आजाराची लक्षणे दिसून आल्यानंतर काही वेळातच गाईंचे मृत्यु होत आहेत. यामुळं भीतीचं वातावरण आहे. यासंदर्भात औरंगाबाद विभागीय पशू संवर्धन विभागाची टीम आष्टीत दाखल झाली आहे. मृत गायींचं शवविच्छेदन करून शरीरातील काही भागांचे नमुने भोपळच्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे. जिल्हा पशुसंवर्धन प्रभारी डॉ. विनायक देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे. (वाचा-क्या हुवा तेरा वादा..! चंद्रपूरची दारुबंदी उठवल्याने चित्रा वाघ यांची टीका) आष्टी तालुक्यात तवलवाडी, वाळुंज परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतकरी मुक्त गायगोठा पद्धतीनं आधुनिक दुग्धव्यवसाय करतात. गेल्या पाच सहा दिवसांपासून तवलवाडी परिसरात घटसर्प, थायरेलेलीस या साथीच्या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. त्यानंतर काही वेळातच गाईंचे मृत्यु होत आहेत. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने शुक्रवारी आरोग्यविषयक सर्वेक्षण केलं. त्यानंतर शनिवारी अधिकारी डॉक्टर यांच्या उपस्थित आमदार सुरेश धस यांनी शेतकरी व पशुपालक यांच्याशी चर्चा केली. पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं योग्य तो विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं. तवलवाडी गावामध्ये 4 ते 5 दिवसांत तब्बल 60 संकरीत गाई आणि 80 च्या आसपास वासरं घटसर्प सदृश्य आजारानं दगावली आहेत. गाईंच्या मृत्यूमागचं नेमकं कारण शोधलं जात आहे. आधीच दुधाच्या घसरलेल्या दराने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यात लॉकडाऊनच्या परिस्थितीत कोरोना महामारीच्या काळामध्ये शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा संकट घोगावत आहे. त्यामुळं पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी सुरेश धस करत आहेत.
  Published by:sachin Salve
  First published: