बीडमधील विदारक दृश्य, बेडअभावी महिलावर बाकावरच उपचार सुरू

बीडमधील विदारक दृश्य, बेडअभावी महिलावर बाकावरच उपचार सुरू

हा धक्कादायक प्रकार बीडच्या जिल्हा रुग्णालयात उघडकीस आला. या घडलेल्या प्रकाराने संताप व्यक्त केला जात असून...

  • Share this:

बीड, 17 एप्रिल :  बीड (Beed) जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. लवकर बेड उपलब्ध न झाल्याने एका कोरोनाबाधित महिलेला चक्क बाकड्यावरच ऑक्सिजन लावून उपचार  घ्यावा लागला. हा धक्कादायक प्रकार बीडच्या जिल्हा रुग्णालयात (Beed District Hospital) उघडकीस आला. या घडलेल्या प्रकाराने संताप व्यक्त केला जात असून आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात गेल्या 48 तासात 23 कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. शुक्रवारी दिवसभरात 12 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तर आज दुपारी 12 वाजेपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आणखी 9 मृतदेह शवागृहात आहेत. दिवसेंदिवस वाढती रुग्ण संख्या आणि मृत्युदर यामुळे जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे.

डोहाळे जेवणात अभिनेत्रीनं केला भन्नाट डान्स; Video होतोय व्हायरल

समुह संसर्गाने बीड जिल्ह्यात विळख्यात घेतले आहे. त्यात अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.  जिल्ह्यात आज 1211 पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. एकूण 4262 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची वाढती संख्या पाहता चिंता व्यक्त केली जात आहे.

दररोज हजारोंपेक्षा जास्त रुग्ण आढळून येवू लागले आहेत. आज आलेल्या अहवालात 1211 पॉझिटिव्ह नवीन रुग्णांची भर पडली. अंबाजोगाईमध्ये 337, आष्टी 119, बीड 143, धारूर 47, गेवराई 39, केज 112, माजलगाव 65, परळी 138, पाटोदा 99, शिरूर 53, वडवणी 59 रुग्ण आढळून आले आहे.

आंतरजिल्हा, आंतरराज्य प्रवासाच्या निर्बंधांबाबत केंद्राचे राज्यांना निर्देश

जिल्ह्यामध्ये अगोदरच अति रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे बेडची संख्या कमी पडू लागले आहे. त्यातच आर रेमडीसीवीर तुटवडा आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे मोठी धावपळ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असताना दुसरीकडे हा गंभीर प्रकार समोर आल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याचे चित्र दिसत आहे.

Published by: sachin Salve
First published: April 17, 2021, 9:39 PM IST

ताज्या बातम्या