मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बीड हादरलं, अवघ्या 13 तासात 6 रुग्णांचा मृत्यू

बीड हादरलं, अवघ्या 13 तासात 6 रुग्णांचा मृत्यू

पुण्यात 54 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 17 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात 54 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 17 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच कोरोना रूग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत असल्याचे बीड जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे.

बीड, 12 ऑगस्ट : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असलेल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. त्यातच अवघ्या 13 तासांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच कोरोना रूग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत असल्याचे बीड जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. अत्यावस्थ झालेल्या कोरोना रूग्णांवर अंबाजोगाईतील  स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात येतात. सुशांतच्या वडिलांबद्दल केलेल्या दाव्यावर संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले... मंगळवारी रात्रीपासून अवघ्या 13 तासांत 6 कोरोना रूग्णांचा स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यात तीन पुरूष आणि तीन महिला रूग्णांचा समावेश असून ते अंबाजोगाई, परळी आणि केज तालुक्यातील आहेत.  बीडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ही 2139 वर पोहोचली आहे. 1492 रुग्णांवर उपचार सुरू आहे. बीडमध्ये पुन्हा लॉकडाउन बीडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये 10 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. रुग्णवाढीचा दर कमी करण्यासाठी प्रशासनाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ...दोन दिवसांचा वेळ देतो, तुकाराम मुंढेंनी खासगी हॉस्पिटलला दिला अल्टिमेटम बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज ही शहरे 12 ऑगस्ट पासून 21 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती दिली आहे. रॅपिड अँटिजेन टेस्ट पूर्ण झाल्यावर पाच शहरे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं. मोठी बातमी! IPL सुरू होण्याआधीच सापडला पहिला कोरोना रुग्ण बीड शहरातील अँटीजन टेस्टमध्ये पहिल्याच दिवशी- 86 नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. एकाच दिवसात तब्बल 203 नवे कोरोना बाधित आढळले. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा 1670 झाला आहे. रॅपिड अँटिजेन टेस्ट शिवाय दुकान उघडण्यास परवानगी नाही, असाही निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ दरम्यान, राज्यात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. एका दिवसात तब्बल 11 हजार 88 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 5 लाख 35 हजार 601 एवढी झाली आहे. तर दिवसभरात 256 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्युदर 3.42 टक्के इतका आहे. राज्यात आज 10 हजार 14 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यात आजपर्यंत 3 लाख 68 हजार 435 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 68.79 टक्के एवढं झालं आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या