Elec-widget

बीडमधील सुमित वाघमारे हत्येप्रकरणी 2 प्रमुख आरोपींना अटक

बीडमधील सुमित वाघमारे हत्येप्रकरणी 2 प्रमुख आरोपींना अटक

बहिणीने प्रेम विवाह केल्याचा राग आल्याने तिच्या पतीचा भरस्त्यात निर्घृणपणे खून करणाऱ्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना सहाव्या दिवशी पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

बीड, 24 डिसेंबर : बहिणीने प्रेम विवाह केल्याचा राग आल्याने तिच्या पतीचा भरस्त्यात निर्घृणपणे खून करणाऱ्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना सहाव्या दिवशी पोलिसांनी अटक केली आहे.

19 तारखेला बहिणीच्या नवऱ्याची भावाने मित्रांच्या मदतीने धारधार शस्त्राने वार करून हत्या केली होती. गेल्या बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली होती. मयत सुमित वाघमारे हा आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत होता. परीक्षा देऊन घरी परतत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. कॉलेजपासून जवळच करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये सुमितचा जागीच मृत्यू झाला. या बाबतीत भाग्यश्रीच्या तक्रारारीवरून पेठ बीड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात अला होता.

मंगळवारी सुमितच्या दोन्ही मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या अटकेसंदर्भात माहिती देण्यासाठी  पोलिसांनी दूपारी 12 वाजता पत्रकार परिषद ठेवली आहे.

वाघमारे कुटुंबाला कुठलंही संरक्षण देण्यात आलेलं नव्हतं. जर पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही तर मी अन्नत्याग करेन, असा इशारा भाग्यश्री वाघमारे यांनी दिला होता. 4 तासांत आरोपींना पकण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं होतं. पण घटनेला 6 दिवस झाल्यानंतर आज एका आरोपींना अटक करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

Loading...

खोट्या प्रतिष्ठेसाठी 'सैराट' सिनेमात ज्या प्रकारे आर्ची आणि परश्याची हत्या करण्यात आली होती तशीच घटना बीडमध्ये घडली. बहिणीनं प्रेमविवाह केला या रागातून भावाने आपल्या मित्राच्या मदतीने बहिणीच्या पतीची भररस्त्यावर निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली. बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास शहरातील आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटवर हा गंभीर प्रकार घडला.

इंजिनिअरिंगची परीक्षा देवून परतत असताना सुमित शिवाजी वाघमारे आणि त्यांची पत्नी भाग्यश्री वाघमारे यांच्यावर मोटारसायकलवर आलेल्या बालाजी लांडगे आणि त्यांच्या मित्रानं धारधार शस्त्रानं हल्ला केला. यात सुमितचा जागीच मृत्यू झाला, तर भाग्यश्री जखमी झाली.


VIDEO : 2019 मध्ये या राशीची लोकं होतील मालामाल आणि यांना राहावं लागेल सावध


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2018 09:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...