लग्न मंडपात आलं वावटळ, मंडप उद्ध्वस्त तर अनेक वऱ्हाडी जखमी

लग्न मंडपात आलं वावटळ, मंडप उद्ध्वस्त तर अनेक वऱ्हाडी जखमी

बीडमध्ये अशाच एका लग्नात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेगवेगळ्या फुलांनी आणि वऱ्हाडाने गजबजलेला एक लग्न सोहळा काही मिनिटात उद्ध्वस्त झाला. त्याचं कारण आहे वावटळ.

  • Share this:

बीड, 07 मे : सध्या सगळीकडेच लग्नसराई सुरू आहे. बीडमध्ये अशाच एका लग्नात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेगवेगळ्या फुलांनी आणि वऱ्हाडाने गजबजलेला एक लग्न सोहळा काही मिनिटात उद्ध्वस्त झाला. त्याचं कारण आहे वावटळ.

सनईचौघडा वाजत होता. नवरदेव मांडवात आला होता. पाहुणे मंडळींचं स्वागत करण्याकरता कार्यवाह मग्न होते. नवऱ्या मुलीला घेवून या असं ब्राम्हणांकडून सांगण्यात येत होतं. लग्नाला अवघे काही मिनिटंच बाकी होते. एवढ्यात मोठं वावटळ आलं आणि मंडपात घुसलं. यामुळे पूर्ण मंडप उडाला. लाकडी, लोखंडी अँगल अंगावर पडले. ज्यामध्ये 20 ते 25 वऱ्हाडी जखमी झाले. जखमींवर नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथील चौधरी वस्तीवर मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. चौधरी आणि झांबरे यांचा विवाह सोहळा होता. लग्नाला काही मिनिटांचा अवधी असल्याने आलेले पाहुणे आणि वऱ्हाडी लग्न मंडपात बसले होते. अचानक तीनच्या सुमारास जोरात वावटळ आलं. ते मंडपात घुसल्याने मंडप उडाला आणि सगळी दाणादाण झाली.

यातील लाकडी बल्ली अंगावर पडल्याने अनेक वऱ्हाडी जखमी झाले. वावटळीमुळे मोठा मंडप अवघ्या काही क्षणात उलटून टाकल्यानं पाहुणे मंडळींची त्रेधातिरपीट उडाली. पण लग्न होणं तर आवश्य होतं. म्हणून परत मंडप टाकणं शक्य झालं नाही. त्यामुळे बाजूच्या मंदिरात लग्न सोहळा पार पडला.

वावटळीमधील जखमींची नावं

छबु मारूती घुले, सुशीला राजेंद्र साके, मथुरा निवृत्ती कर्डिले, नंदाबाई कोंडिबा झांबरे, नवनाथ नामदेव शिंदे, पद्माबाई साके, जनाबाई अंबादास पांडुळे, लहू दशरथ गांगर्डे, वैशाली संदिप गोरे, वैशाली तरटे, रमेश बोडखे, मथुराबाई गांगर्डे, संगीता संजय बोडखे, यमुना बबन झांबरे, शिवानी अंकुश गुंड, आश्विनी शिंदे, रावसाहेब गजघाट.

VIDEO : तुला फिरवीन गाडीवर, वरातीत तब्बल 63 नवरदेवांचा साॅलिड डान्स

First published: May 7, 2019, 7:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading