S M L

मुलीमध्ये होतेय मुलाची वाढ, लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेची गरज

बीड मधल्या चिमुरडीच्या रुपात वाढतोय एक मुलगा. हो तुमच्या ऐकण्यात काही चुक नाही झालीय. हार्मोन्स बदलामुळे या चिमुरडीच एक मुलांत रुपांतर होत आहे आणि तिला गरज आहे लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेची.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2018 09:04 PM IST

मुलीमध्ये होतेय मुलाची वाढ, लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेची गरज

शशी केवडकर, बीड,ता.7 जुलै : बीड मधल्या चिमुरडीच्या रुपात वाढतोय एक मुलगा. हो तुमच्या ऐकण्यात काही चुक नाही झालीय. हार्मोन्स बदलामुळे या चिमुरडीच एक मुलांत रुपांतर होत आहे आणि तिला गरज आहे लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेची. मात्र परिस्थिती बेताची असल्यामुळं त्या चिमुकलीच्या पालकांसमोर मोठ संकट उभं ठाकलंय. मस्तीखोर, लडीवाळ... अशा ५ वर्षाच्या एक चिमुरलीच्या शरीरात वाढतोय एक मुलगा. हो बरोबर ऐकलंत तुम्ही.. वयाच्या दोन वर्षापासुन तिच्या शरीरात असे बदल घडतायत की ती मुलगी नसुन मुलगा आहे असं डॉक्टरांनी या छोठ्या परिच्या आईबाबांना सांगितल आणि तिच्या शारीरिक बदलांना अपेक्षित असं लिंगबदलाच ऑपरेशन करायलाही सांगितलंय.

पण तेवढी आर्थिक परिस्थिती नसल्यानं पुढं जायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय.या चिमुकलीला मुलाचं आयुष्य बहाल करायला ५ ऑपरेशन्स आणि १२ ते १३ लाखांचा खर्च अपेक्षित आहे पण एक ट्रकचालक असलेल्या तिच्या पित्याला हा खर्च झेपणारा नाही.

पाच वर्षाच्या मुलीत अडकलेल्या मुलाला आपलं आयुष्य जगण्यासाठी गरज आहे लोकांच्या आर्थिक आधाराची.हेही वाचा...

VIDEO : थरार, जगबुडीच्या पुरातून 80 जणांची अशी केली सुटका

VIDEO : वसईतल्या धबधब्यावर 35 जण अडकले,बचाव कार्य सुरू

Loading...

विद्यार्थ्यांनो 'नीट' लक्ष द्या! आता वर्षातून दोन वेळा होणार परीक्षा

सनी लिओनच्या बायोपिकचा ट्रेलर पाहिलात का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2018 07:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close