मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Beed Dengue : बीड जिल्ह्यात डेंग्युचे थैमान 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Beed Dengue : बीड जिल्ह्यात डेंग्युचे थैमान 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

वडवणीच्या पिंपरखेड गावातील पाच वर्षीय चिमुकलीचा, डेंग्यूने उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय. वेदिका भगवान साबळे वय 5 असं मयत चिमुकलीचे नाव आहे.

वडवणीच्या पिंपरखेड गावातील पाच वर्षीय चिमुकलीचा, डेंग्यूने उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय. वेदिका भगवान साबळे वय 5 असं मयत चिमुकलीचे नाव आहे.

वडवणीच्या पिंपरखेड गावातील पाच वर्षीय चिमुकलीचा, डेंग्यूने उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय. वेदिका भगवान साबळे वय 5 असं मयत चिमुकलीचे नाव आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

बीड, 04 ऑक्टोंबर : बीडच्या वडवणी शहरासह तालुक्यात संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून प्रत्येक गावागावात रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच आता वडवणीच्या पिंपरखेड गावातील पाच वर्षीय चिमुकलीचा, डेंग्यूने उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय. वेदिका भगवान साबळे वय 5 असं मयत चिमुकलीचे नाव आहे.

पिंपरखेड येथील शाम भगवान साबळे यांच्या वेदिका या 5 वर्षीय मुलीला दहा दिवसांपूर्वी आजाराने ग्रासले. त्यामुळे तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तपासणी अंती डेंग्यू आजाराने तिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : कोल्हापुरात अवघ्या 23 वर्षीय पैलवानाचा सरावादरम्यान मृत्यू, कुस्ती जगतात शोककळा

दरम्यान वडवणी शहरासह तालुक्यात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यासारख्या संसर्ग आजाराने थैमान घातले आहे. याला आरोग्य विभागासह ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासन देखील जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. गावात अस्वच्छता, रस्त्यावर पाण्याचे डबके, मच्छर आदी प्रश्नांनी ग्रासले असल्याने यातूनच डेंग्यूसारखे आजार फोफावले असल्याचे बोलले जात आहे. आरोग्य प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

शाळा सुटली अन् 13 वर्षांची श्रद्धा जीवाला मुकली

शाळेतून घरी जाण्यासाठी सायकलवर निघालेल्या 13 वर्षीय मुलीचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कन्नड तालुक्यातील पानपोई फाट्या नजीक शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. श्रद्धा सोमीनाथ पिंपळे असं या 13 वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. श्रद्धा पिंपळेही सातव्या वर्गात शिकत होती.

हे ही वाचा : गरबा खेळताना काळजी घ्या! बुलडाण्यात आणखी एकाचा हृदयविकाराच्या धक्काने मृत्यू

नेहमीप्रमाणे श्रद्धा शाळेत गेली होती. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर ती घरी परत येत होती. पाणपोई फाट्या जवळील बनशेंद्रा शिवारातील बहिरगाव डोणगाव रोडवर शाळेतून सायकलवरून घरी येत असताना अचानक एका भरधाव ट्रॅक्टरने तिला धडक दिली. धडक बसल्यामुळे श्रद्धा चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली होती.

First published:

Tags: Beed, Beed news, Health