कोरोना निगेटीव्ह अहवालाचा जल्लोष पडला महागात, गुन्हा दाखल

कोरोना निगेटीव्ह अहवालाचा जल्लोष पडला महागात, गुन्हा दाखल

बीडमध्ये एक अजब प्रकार समोर आला असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

बीड, 12 जून : कोरोनाचं संकट गडद होत असताना काही संतापजनक घटना समोर येत आहेत. कोरोनाला प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र बीडमध्ये एक अजब प्रकार समोर आला असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना निगेटीव्ह अहवालाचा जल्लोष करणं डॉक्टरासह खासगी हॉस्पिटला चांगलंच महागात पडलं आहे. माजलगाव येथील देशपांडे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका वृद्धाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. त्यामुळे सदर रुग्णाच्या संपर्कातील आलेल्यांचे स्वॅब तपासण्यात आले. त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर रुग्णालयासमोर ढोल वाजवून व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

यावेळी बेभान नाचणाऱ्यांमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे या प्रकरणी माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमध्ये काय आहे कोरोनाची स्थिती?

महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अनेक दिवस कोरोनापासून दूर राहिलेल्या बीड जिल्ह्यात नंतरच्या काळात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीडमधील कोरोनााबधितांची संख्या जरी कमी असली तरीही आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर आचा विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 12, 2020, 11:59 AM IST

ताज्या बातम्या