सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड, 02 फेब्रुवारी : बीडमध्ये पाच लाखाची लाच घेताना अप्पर जिल्हाधिकारी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुरवठा विभागातील चौकशीचा अहवाल सोयीस्कर देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांनी चक्क 5 लाखांची मागणी केली होती.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळेच्या शासकीय निवासस्थानी जाऊन ही कारवाई केली आहे. बी. एम. कांबळे हे गेल्या 3 वर्षांपासून बीडमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या या वागणूकीमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात बी. एम. कांबळे यांच्यासोबत त्यांच्या कारकूनालाही ताब्यात घेतलं आहे. महाकुंडे असं त्यांचं नाव आहे. बी. एम. कांबळे यांच्याकडे पुरवठा विभागाचाही पदभार होता.
दरम्यान, या प्रकरणात आता पोलिसांनी अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे. बी. एम. कांबळे यांच्या कार्यालयातही त्यांच्यासंबंधी चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
VIDEO: AK-47ने गोळ्या झाडून पोलिसांनी हल्लेखोरांना केलं ठार, पाहा लाईव्ह एन्काऊंटर