कोरोनाच्या संकटात बीडमध्ये वकिलांनीच मोडला कायदा, 11 जणांना अखेर दणका

कोरोनाच्या संकटात बीडमध्ये वकिलांनीच मोडला कायदा, 11 जणांना अखेर दणका

कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी बीड शहरात संचार बंदी आदेश लागू केले आहेत.

  • Share this:

बीड, 9 जुलै : कोर्टाच्या आवारात सोशल डिस्टन्सिंग आणि संचारबंदीचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा करणं बीडच्या 11 वकिलांना चांगलंच महागात पडलं आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी बीड शहरात संचार बंदी आदेश लागू केले आहेत. ते धुडकावून सोशल डिस्टन्सिंग न पाळत वाढदिवस साजरा केल्याने शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन, जमावबंदी लागू असताना जल्लोषात वाढदिवस सेलिब्रेशन केल्याप्रकरणी अकरा वकिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. बीड जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड प्रवीण राख यांचा काल 7 जुलै रोजी वाढदिवस होता. वकील साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या मित्र मंडळींनी कोर्टाच्या आवारात कार्यक्रम घेतला.

विशेष म्हणजे या सेलिब्रेशनला तीन ते चार माजी अध्यक्ष हजर होते. कायद्याचं ज्ञान असणाऱ्या प्रतिष्ठीत वकील मंडळींनी सोशल डिस्टन्सिंग पाळले नाहीत. एवढंच काय तोंडाला मास्क देखील बांधले नव्हते. या ठिकाणी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम झाला. यामुळे सोशल डिस्टन्सिंग न पाळणे , जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

या सेलिब्रेशनचे फोटो फेसबुकवर टाकण्यात आले होते. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अ‍ॅड प्रवीण राख , अ‍ॅड अविनाश गंडले , अ‍ॅड भीमराव चव्हाण , प्रभाकर आंधळे , उद्धव रासकर , श्रीकांत साबळे , गोवर्धन पायाळ , विकास बडे , श्रीकांत जाधव , विनायक जाधव , रोहिदास येवले या सर्व वकील मंडळींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .

Published by: Akshay Shitole
First published: July 9, 2020, 11:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading