‘मुंबई मेट्रो 3’ च्या कामाने नागरिक हैराण, ट्विट करुन व्यक्त केली नाराजी

‘मुंबई मेट्रो 3’ च्या कामाने नागरिक हैराण, ट्विट करुन व्यक्त केली नाराजी

रात्री पाऊणलाही जर काम सुरू राहिले तर आम्हाला शांतता कधी मिळणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 04 जानेवारी 2019- सध्या संपूर्ण मुंबईत मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे मुंबईकरांना प्रचंड वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मेट्रोचं काम सकाळपासून रात्रीपर्यंत करण्याचा निर्णय यंत्रणेकडून घेण्यात आला होता. मात्र तरीही काही भागात मध्यरात्रीही मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे मेट्रो शेजारी राहणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

अनेकांनी ट्विटरवरुन याबद्दल तक्रार करुनही प्रशानसनाकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर देण्यात आलेलं नाही. ऑरेलियस प्रसाद या ट्विटर युझरने नुकताच एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. यात त्यांनी मध्यरात्रीही अंधेरी पूर्व येथील मरोळ भागात मेट्रो 3 चं काम चालल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचं स्पष्ट म्हटलं आहे.

रात्री पाऊणलाही जर काम सुरू राहिले तर आम्हाला शांतता कधी मिळणार? असा प्रश्न त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अश्विनी भिडे यांना विचारला. गेल्या दोन दिवसांपासून दिवसाप्रमाणे रात्रीही मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे, दिवसभराच्या कामातून थकून आलेल्या चाकरमान्यांना रात्रीची शांतपणे झोपही मिळत नाही. मुंबईकरांचं भविष्य सुखकर करणारी स्वप्न दाखवणारं प्रशासन नागरिकांच्या वर्तमानातल्या प्रश्नांचं निरसण करणार का? हा खरा प्रश्न आता उभा राहिला आहे.

VIDEO : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज

First published: January 4, 2019, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading