जुन्नरमध्ये प्रत्येकाच्या स्टेटसवर आहे हा मनमोहक VIDEO, या भगव्या रंगाच्या तुम्हीही पडाल प्रेमात

जुन्नरमध्ये प्रत्येकाच्या स्टेटसवर आहे हा मनमोहक VIDEO, या भगव्या रंगाच्या तुम्हीही पडाल प्रेमात

हाच भगवा रंग हिंदु धर्मात पवित्रही मानला जातो. पण हा भगवा रंग जर शिवजन्मभूमीच्या प्रेमात पडला तर?

  • Share this:

पुणे, 07 सप्टेंबर : राज्यात रविवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. संध्याकाळ होताच अगदी ढगाळ वातावरणासह मनमोहक दृष्य पाहायला मिळालं. अशात भगव्या रंगाचं अनेकांना आकर्षण असतं. हाच भगवा रंग हिंदु धर्मात पवित्रही मानला जातो. पण हा भगवा रंग जर शिवजन्मभूमीच्या प्रेमात पडला तर?

रविवारी सायंकाळी आसमंत दाटून आले आणि काही सेकंद शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी भगव्या रंगात बुडून गेली. सायंकाळ झाल्याने घरट्याकडे परतणाऱ्या पक्षांचा थवाही या निमित्त यात वेगळं सौंदर्य खुलवत होता. ही नयनरम्य आणि डोळे दिपवणारी दृश्य अनेकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आणि प्रत्येकाच्या स्टेटसवर सुद्धा झळकू लागली.

News 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी भगव्यात बुडालेल्या किल्ले शिवनेरीची ही काही विशेष दृश्य. खरंतर, कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन आहे. अशात प्रत्येकावर घरात बसण्याची वेळ आहे. लोकांची बाहेरची वर्दळ कमी झाली. भरधाव गाड्या रस्त्यावरून गायब झाल्या आणि हवेतील प्रदुषणही आटोक्यात आलं.

या सगळ्यामुळे निसर्ग अगदी खुलला आहे. त्याचे हे दृष्य पाहून मनाला शांती मिळते. आनंदाचं हसू येतं आणि सुखाचा अनुभवही होतो. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात व्यस्त असणाऱ्या सगळ्यांनीच निसर्गाचा आनंद घ्यायलाच हवा.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 7, 2020, 11:35 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading