Home /News /news /

सरांच्या प्रश्नांना कशाल उत्तरं देतो म्हणत वर्गमित्रांनी केली हुशार विद्यार्थ्याला मारहाण

सरांच्या प्रश्नांना कशाल उत्तरं देतो म्हणत वर्गमित्रांनी केली हुशार विद्यार्थ्याला मारहाण

वर्गात हुशार आहे म्हणून पुण्यात 8 वीच्या विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

पुणे, 29 जानेवारी : वर्गात हुशार आहे म्हणून पुण्यात 8 वीच्या विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांनी  मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिक्षकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देतो आणि शिक्षक या मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला येत नाही म्हणून रागवत असल्याच्या रागातून त्यांनी हे कृत्य केलं.  महिन्य़ाभरापूर्वी घडलेल्या घटनेवर शाळेने काहीच पावलं न उचलल्याने पालकांनी अखेर पोलिसात तक्रार दिली आहे. पुण्यात हडपसर भागातील सय्यद नगर भागात एका शाळेतील हुशार विद्यार्थ्याला वर्गातील 15 जणांनी तू कशाला सरांच्या प्रश्नांची उत्तरे देतोस,आम्हाला येत नाही म्हणून बोलणी खावी लागते असं म्हणून म्हणून बेदम मारहाण केली होती. मारहाण झाल्यामुळे  हा विद्यार्थी सध्या घरी आहे. मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 7 दिवस निलंबित करून कडक समज दिली जावी, मात्रस त्यांना पोलिसी कारवाई न करता समुपदेशन केलं जावं, अशी पालकांची अपेक्षा होती. मात्र, शाळेने काहीच पावलं न उचलल्याने वानवडी पोलीस ठाण्यात पालकाने धाव घेतली. सर्व विद्यार्थी अल्पवयीन आहेत, मात्र, आता त्यांच्यावर मारहाण करणे, दंगल माजवणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो सर्व जण अभ्यासात हुशार असतात असं नाही. यामुळं तुलना करू नये याचा विपरीत परिणाम कोवळ्या मनांवर होतो असं समुपदेशक आरती पेंडसे यांचं म्हणणं आहे. या पालकांनीही याबाबत शाळेला जबाबदार धरलं आहे. या घटनेनंतर हुशार मुलगाही मनाने खचला आहे.  मात्र, त्याचे पालक त्याला धीर देऊन हिंमत वाढवत आहेत तसंच ज्यांनी मारहाण केली. त्यांनाही शिक्षा होऊ नये तर त्यांचही समुपदेशन करावे, अशी प्रगल्भ भूमिका त्यांनी घेतली आहे. पण अनाठायी तुलना आणि अभ्यासात  हुशार असणे म्हणजे काही तरी उच्च अशा कल्पना एकूणच शिक्षण पद्धती, परीक्षा पद्धती, गळेकापू स्पर्धा यावर आणि समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवणारी ही घटना आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या