Home /News /news /

मुंबईकरांनो, सावधान! दूध बॅग खरेदी करताना घ्या काळजी, कारण...

मुंबईकरांनो, सावधान! दूध बॅग खरेदी करताना घ्या काळजी, कारण...

दूध कंपन्यांच्या मूळ पिशव्या कात्रीने कापून त्या पिशव्या मधील दूध काही प्रमाणात बाहेर काढून त्यामध्ये मानवी जीवनास हानिकारक असे दूषित पाणी मिसळत होते

मुंबई, 09 जानेवारी :   जर तुम्ही दूध खरेदी करत असाल तर सावधान कारण, मुंबईत नामांकीत कंपन्यांच्या दुधामध्ये भेसळ करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबईत गोरेगाव पोलीस ठाणे आणि बांगुरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही इसम नामांकीत कंपन्यांचा दुधाचा पिशवीत दूषित पाणी मिसळून ते दूध ग्राहकांना वितरीत करत असल्याबाबत गुन्हे शाखा कक्षा १२ ला माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा १२ ने दोन पथके तयार करण्यात आली होती. सदर पथकांत अन्न आणि औषध प्रशासन बृहन्मुंबई महाराष्ट्र शासन येथील अन्नसुरक्षा अधिकारी यांच्या समावेश करून गोरेगाव पश्चिम भगतसिंग नगर, लिंक रोड येथे छापा टाकून नमूद ठिकाणाहून एक व्यक्ती आणि एका महिलेस  दुसरा पथकाने हनुमान नगर गोरेगाव पश्चिम मुंबई येथे छापा टाकून दोन इसमांना ताब्यात घेतले. दोन्ही पथकांनी ताब्यात घेतलेले तीन तरुण आणि एक महिला हे नामांकीत अमूल दूध कंपन्यांच्या मूळ पिशव्या कात्रीने कापून त्या पिशव्या मधील दूध काही प्रमाणात बाहेर काढून त्यामध्ये मानवी जीवनास हानिकारक असे दूषित पाणी मिसळून त्या दुधाच्या पिशव्या स्टोव्ह पिन आणि मेणबत्तीच्या सहाय्याने पुन्हा सिल करून नामांकित कंपन्यांचे प्रमाणित दूध आहे असं भासवून, ग्राहकांची फसवणूक करून गैरकायदेशीर लाभ मिळविण्याच्या इरादयाने विक्री करण्याच्या तयारीत होते. मात्र, त्याच वेळी गुन्हे शाखा 12 नंबर दोन्ही टीमने आरोपींना पकडून त्यांच्याकडून एकूण 139 लिटर भेसळयुक्त दूध ताब्यात घेऊन, सदर ठिकाणीतून दूध भेसळ करण्याकरिता लागणारे साहित्य अमूल कंपन्यांच्या बनावट पिशव्या, प्लास्टिकच्या पिशव्या हस्तगत करून या चौघा आरोपींना अटक करून पुढील तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Crime, Milk, Mumbai, Mumbai police

पुढील बातम्या