मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सावधान! गेल्या 24 तासात राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात मोठी वाढ, चिंता वाढवणारा आकडा

सावधान! गेल्या 24 तासात राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात मोठी वाढ, चिंता वाढवणारा आकडा

वयोवृद्ध व्यक्ती डायबेटीज पेशंटला कोरोना झाल्यास धोका वाढतो आणि याच पेशंटला ब्लॅक फंगस इन्फेक्शनची भितीही जास्त असते. डायबेटीज पेशंटच्या शरीरात ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं. ऍन्टी-फंगल ट्रिटमेंटनंतरही जास्त काळ औषधोपचार घ्यावे लागतात.

वयोवृद्ध व्यक्ती डायबेटीज पेशंटला कोरोना झाल्यास धोका वाढतो आणि याच पेशंटला ब्लॅक फंगस इन्फेक्शनची भितीही जास्त असते. डायबेटीज पेशंटच्या शरीरात ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं. ऍन्टी-फंगल ट्रिटमेंटनंतरही जास्त काळ औषधोपचार घ्यावे लागतात.

राज्यातील नागरिकांना कोरोना लशीची प्रतीक्षा आहे. मात्र यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 20 डिसेंबर : राज्यात कोरोनाची (Maharashtra Coronavirus) लागण होण्याच्या प्रमाणात घट होत असली तरी मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात 2064 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असला तरी 3811 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे गेल्या 24 तासात 98 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल हा आकडा 75 इतका होता. तर आज हा आकडा 98 पर्यंत पोहोचला आहे. आज राज्यातून 1783905 जणांचा डिस्चार्ज झाला आहे. यानुसार रिकव्हरी रेट 94.06 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आजच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर दिवसागणिक वाढत आहे, आणि ही चिंता वाढवणारी बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे नियमित पालन करणे गरजेचे आहे. नव्या वर्षात कोरोनाचा (Coronavirus) भर ओसरणार, देश कोरोनामुक्त होणार, अशी भविष्यवाणी चर्चेत होती. पण त्यात किती तथ्य आहे?  केंद्रीय पातळीवर तयार करण्यात आलेल्या एक्सपर्टस पॅनेलने (Expert Panel) सुपर मॉडेलच्या (Super Model) आधारे असं म्हटलं आहे की, भारतीय प्रशासनाची उदासीनता आणि कोरोनाबाबत (Corona) अपेक्षित प्रमाणात चाचण्या करण्यासाठी पुरेशी क्षमता नसल्याने खरी परिस्थिती लक्षातच आलेली नाही. या पॅनेलच्या मते,  फेब्रुवारी 2021 मध्ये देशात कोरोना मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आला असेल, पण धोका संपलेला नसेल. या पॅनेलने त्यांच्या सुपर मॉडेलनुसार, फेब्रुवारी 2021 पर्यंत भारतातील कोरोना साथ जवळपास संपुष्टात येईल, असा अंदाज वर्तवला आहे. भारतात या कालवाधीनंतर कोरोना संसर्गाची लाट येण्याची शक्यता नाही. फेब्रुवारी 2021 मध्ये अक्टिव्ह केसेसची संख्या केवळ 20 हजारच राहील, कारण संसर्ग झाला आहे की नाही हे स्पष्ट होऊ न शकलेल्या केसेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल.
First published:

Tags: Coronavirus, Mumbai

पुढील बातम्या