पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना बीसीसीआय देणार 20 कोटी

पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना बीसीसीआय देणार 20 कोटी

बीसीसीआयच्या वतीने ही रक्कम आर्मी वेलफेयर फंडात जमा केली जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 मार्च : 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यातील शहीद जवांनाच्या कुटुंबीयांना २० कोटी रुपये देण्याचा निर्णय भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. बीसीसीआयच्यावतीने ही रक्कम आर्मी वेलफेयर फंडात जमा केली जाणार आहे.

त्याचबरोबर दि. 23 मार्चपासून चेन्नई येथे सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) शुभारंभीच्या सामन्यातही हवाई दल, नौदल आणि लष्करी अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्याचा विचार बीसीसीआयकडून केला जात आहे. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई विरुद्ध बंगळुरू असा होणार आहे. दरम्यान, यावेळी प्रशासक समितीने आर्मी वेलफेअर फंडात २० कोटी रुपये जमा करण्याची परवानगी दिली आहे. आयपीएलचा शुभारंभीच्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कर्णधार विराट कोहली उपस्थित असतील.

गेली कित्येक वर्ष आयपीएलच्या उद्धाटनाप्रसंगी करोडो रुपये खर्च केले जातात. गेल्या वर्षी आयपीएल सामन्यांच्या उद्घाटन समारंभासाठी १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यावर्षी मात्र, बीसीसीआयच्या एक वेगळा विचार करण्यात आला आहे. तो म्हणजे, उद्धाटनाचे बजेट वाढवून त्याची रक्कम २० कोटी करण्यात आली, मात्र हे पैसे आर्मी वेलफेअर फंडात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या बीसीसीआयच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान भारत विरुध्द ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी लष्कराच्या टोप्या घालत पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहिली होती.


VIDEO : औरंगाबादेत पोहोचल्यानंतर अर्जुन खोतकर म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 08:55 PM IST

ताज्या बातम्या