भारतीय क्रिकेटपटूंची दिवाळी, BCCI देणार दुप्पट पैसे

बीसीसीआयनं क्रिकेटपटूंच्या भत्त्यात वाढ केली असून त्यांना एका दिवसासाठी 7 हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय इतर भत्ते वेगळे असणार आहेत.

  • Share this:

भारतीय क्रिकेटपटूना दिवाळीच्या आधी बीसीसीआयने मोठं गिफ्ट दिलं आहे. खेळाडूंच्या दैनिक भत्त्यात दुप्पट वाढ करण्यात  आली आहे. बीसीसीआय़ प्रशासकांच्या समितीने परदेश दौऱ्यासाठी मिळणाऱ्या भत्त्यात वाढ केली आहे.

आता परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंना दररोज 250 डॉलर मिळतील. आतापर्यंत ही रक्कम 125 डॉलर इतकी होती. तसेच देशात होणाऱ्या  आंतरराष्ट्रीय मालिकेसाठीसुद्धा दैनिक भत्ता वाढवण्यात आला आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत दैनिक भत्त्याबाबत निर्णय घेतला गेला. आतापर्यंत भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी खेळाडूंना 100 डॉलर इतके पैसे मिळत होते.

अमेरिकन डॉलरच्या किंमती दररोज बदलत असल्यानं दैनिक भत्ता निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता भारतीय क्रिकेटपटूंना मायदेशात मालिका खेळताना दैनिक भत्ता म्हणून 7 हजार 500 रुपये मिळणार आहेत.

भारतीय क्रिकेटपटूंचा दैनिक भत्ता हा त्यांचा प्रवास, राहण्याची व्यवस्था आणि कपड्यांची धुलाई हे वगळून असतो. इतर सर्व जबाबदारीदेखील बीसीसीआयची असते. दैनिक भत्ता वाढल्याचा फायदा टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफलासुद्धा होणार आहे.

प्रशासकांच्या समितीनं निवडकर्त्यांचा भत्तासुद्धा वाढला आहे. आता त्यांना देशात मालिका सुरू असेल तर 7 हजार 500 रुपये दैनिक भत्ता मिळेल. परदेश दौऱ्यासाठी पहिल्यापासूनच निवडकर्त्यांना 250 डॉलर मिळत होते. महिला क्रिकेटपटूंना याच प्रमाणात वाढ मिळणार आहे.

क्रिकेटपटूंना मिळणारा दैनिक भत्ता हा त्यांच्या सामन्याच्या मानधन वगळून असतो. बीसीसीआय़ एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख, एकदिवसीय आणि टी20 सामन्यासाठी 3 लाख रुपये देती आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नाही तरी खेळाडूंना तितकेच पैसे मिळतात.

खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावरही करार केला जातो. सध्या 4 प्रकारचे करार केले जातात. यात ए प्लस, ए, बी आणि सी अशी वर्गवारी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 06:01 PM IST

ताज्या बातम्या