Home /News /news /

PolicyBazaar IPO Refund: शेअरही नाही मिळाले आणि पैसेही रिफंड नाही झाले? स्टेटस कसं तपासणार?

PolicyBazaar IPO Refund: शेअरही नाही मिळाले आणि पैसेही रिफंड नाही झाले? स्टेटस कसं तपासणार?

PB Fintech चे शेअर्स मिळाले आहेत ते लिस्टिंगच्या एक दिवस आधी ते डिमॅट खात्यात (demat account) दाखवण्यास सुरुवात करतील. त्यांच्या शेअर्सची लिस्ट 15 नोव्हेंबरला होणार आहे.

    मुंबई, 11 नोव्हेंबर : पॉलिसीबझार (PolicyBazaar Share) शेअर्सचे वाटप 10 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. पैसा बाजार आणि पॉलिसी बाजार यांसारख्या कंपन्या चालवणाऱ्या पीबी फिनटेकच्या इश्यूला 16.59 पट सबस्क्राईब मिळाले. कंपनीच्या 3.45 कोटी शेअर्सच्या बदल्यात 57.24 कोटी शेअर्स मिळाले. PB Fintech ची इश्यू किंमत 940-980 रुपये होती. ज्यामध्ये 15 शेअर्सचा आकार होता. ज्यांना पीबी फिनटेकचे शेअर्स मिळाले आहेत ते लिस्टिंगच्या एक दिवस आधी ते डिमॅट खात्यात (demat account) दाखवण्यास सुरुवात करतील. त्यांच्या शेअर्सची लिस्ट 15 नोव्हेंबरला होणार आहे. ज्यांना त्याचे शेअर्स मिळालेले नाहीत, त्यांचे पैसेही लिस्ट होण्यापूर्वी येतील. शेअर आणि रिफंट दोन्ही मिळाले नाही? जर शेअर्सचे वाटप 10 नोव्हेंबरला झाले असेल आणि तुम्हाला शेअर्स आणि पैसे मिळाले नसतील तर घाबरण्याचे काही कारण नाही. कारण सहसा हे पैसे वाटपाच्या दुसऱ्या दिवशी खात्यात येतात. परंतु कोणत्याही परिस्थितीत, हे पैसे शेअर्सच्या लिस्टिंगपूर्वी तुमच्या खात्यात जमा केले जातील. Gold Investment: सोन्यात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या 6 गोष्टी, मिळेल योग्य फायदा PB Fintech च्या IPO चे रजिस्ट्रार Link Intime India Private Limited आहेत. जर तुम्हीही IPO मध्ये पैसे गुंतवले असतील, तर वाटप अशा प्रकारे तपासले जाऊ शकते. BSE द्वारे कसे तपासायचे? >> सर्वप्रथम https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx वर क्लिक करा. >> या लिंकवर क्लिक केल्यानंतर Status of Issue Application पेज उघडेल. त्यावर इक्विटी पर्याय निवडा. >> ज्या कंपनीसाठी तुम्हाला IPO चे वाटप तपासायचे आहे त्या कंपनीचे नाव निवडा. >> त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक टाका. >> याच्या खाली तुम्हाला तुमच्या पॅनचा तपशील द्यावा लागेल. >> यानंतर, I am not a robot च्या बॉक्सवर क्लिक करून तुमची पडताळणी करा. >> यानंतर सर्च बटण दाबा आणि स्टेटस तुमच्या समोर येईल. पुढील आठवड्यात आहे कमाईची संधी, या IPOमध्ये किती रुपयांत कराल गुंतवणूक? तुम्हाला रजिस्ट्रार कंपनी Linkintime द्वारे वाटप तपासायचे असेल तर >> सर्वप्रथम https://linkintime.co.in/MIPO/Ipoallotment.html या लिंकवर क्लिक करा. >> यानंतर, ड्रॉपबॉक्समध्ये IPO चे नाव निवडा ज्याचं वाटप स्टेटस तपासायचं आहे. >> तुम्ही अर्ज क्रमांक, क्लायंट आयडी, पॅन तीनपैकी कोणतीही एक माहिती देऊन स्टेटस तपासू शकता. >> त्यानंतर तुमच्या अर्जाचा प्रकार निवडा. म्हणजेच, ASBA किंवा Non-ASBA यापैकी एक निवडा. >> तुम्ही जो मोड निवडाल त्यानुसार तुम्हाला त्याखाली माहिती द्यावी लागेल. >> त्यानंतर कॅप्चा भरा आणि सबमिट करा. >> वाटपाची स्थिती तुमच्या समोर उघडेल. पॉलिसीबझार आयपीओ 1 नोव्हेंबर रोजी 5,700 कोटी जमा करण्याच्या उद्दिष्टाने उघडला होता. त्यापैकी 2,569 कोटी रुपये आधीच 29 ऑक्टोबर रोजी अँकर बुकद्वारे उभारले गेले होते. PB Fintech च्या शेअर्सचे वाटप 10 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. ज्यांना पीबी फिनटेकचे शेअर्स मिळतील त्यांच्या डीमॅट खात्यात 12 नोव्हेंबरपासून शेअर्स दिसण्यास सुरुवात होईल. ज्यांना हे शेअर्स मिळणार नाहीत, त्यांचे पैसे 11 नोव्हेंबरपर्यंत खात्यात परत केले जातील. कंपनीच्या शेअर्सचे वाटप आज होणार आहे आणि 15 नोव्हेंबरला लिस्टिंग होणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या