मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अवजड वाहनांसाठी बॅरिअर्स

आता सर्वात डाव्या बाजूच्या लेनमध्ये बसेस आणि अवजड वाहनांसाठी उच्च प्रतिची रबरी बॅरिअर्स लावण्यास सुरुवात करण्यात आलीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 9, 2017 11:26 AM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अवजड वाहनांसाठी बॅरिअर्स

09 मे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अवजड वाहनांना शिस्त लावण्याचे अनेक उपाय आजपर्यंत करण्यात आले. पण त्याचा बेशिस्तीला आळा घालण्यात काही केल्या उपयोग होत नसल्यानं आता प्रशासनानं बॅरिअर्सचा पर्याय निवडलाय.

आता सर्वात डाव्या बाजूच्या लेनमध्ये बसेस आणि अवजड वाहनांसाठी उच्च प्रतिची रबरी बॅरिअर्स लावण्यास सुरुवात करण्यात आलीय. सोमवारी खालापूरजवळ काही बॅरिअर्स लावण्यात आली आहेत. तर टप्प्याटप्प्यानं प्रत्येक 300 मीटरवर ही बॅरिअर आता लावण्यात येणार आहेत.

यामुळे ओव्हरटेकिंगच्या नादात होणारे अपघात टाळण्यास मदत होणार आहे. शिवाय उजव्या लेनमध्ये छोट्या गाड्यांना वेगात प्रवास करता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2017 11:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...