साहित्य संमेलनाच्या अनुदानात 50 लाखांपर्यंत वाढ - मुख्यमंत्री

साहित्य संमेलनाच्या अनुदानात 50 लाखांपर्यंत वाढ - मुख्यमंत्री

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून दिलं जाणारं शासकीय अनुदान पुढच्या वर्षापासून दुप्पट म्हणजेच 50 लाख करण्यात येणार आहे. बडोद्यात भरलेल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

  • Share this:

16 फेब्रुवारी, बडोदा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून दिलं जाणारं शासकीय अनुदान पुढच्या वर्षापासून दुप्पट म्हणजेच 50 लाख करण्यात येणार आहे. बडोद्यात भरलेल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही फडणवीस त्यांनी यावेळी दिली. भाषांमध्ये वाद नको तर संवाद पाहिजे तसंच मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. मराठी विद्यापाठीच्या निर्मितीबद्दल सरकार सकारात्मक असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना सालाबाद प्रमाणे यावर्षीही मराठी सीमा बांधवांनी बेळगाव, कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी घोषणाबाजी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही हो झालाच पाहिजे असे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सीमावासियांच्या होकारात हो मिळवताच लागलीच घोषणाबाजीही बंद झाली. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडतंय. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेही यावेळी उपस्थित होते. तीन चालणाऱ्या या संमेलनात विविध परिसंवादाचं आयोजन करण्यात आलंय.

First published: February 16, 2018, 8:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading