VIDEO : जखमी तरुणांची जगण्यासाठी याचना पण लोकं सेल्फी काढत होते !

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2018 10:43 PM IST

VIDEO : जखमी तरुणांची जगण्यासाठी याचना पण लोकं सेल्फी काढत होते !

राजस्थान, 11 जुलै : हल्ली सेल्फी काढण्याचा मोह कुणालाही आवरत नाही पण याचा इतका अतिरेक झालाय की लोकांना माणुसकीचाही विसर पडल्याची लाजिरवाणी घटना राजस्थान मधील बाडमेरा इथं घडलीये. महामार्गावर झालेल्या अपघातात जखमी तरुण मदतीसाठी याचना करत होते पण काही महाभाग हे मदत करण्याऐवजी सेल्फी काढत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

दोन दिवसांपूर्वी बाडमेरा इथं बसने दुचाकीला टक्कर दिली होती. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमी तरुणांना वेळीत रुग्णालयात दाखल न केल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या दोन दिवसांनंतर अपघातस्थळावरचा एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा तिथे काही तरुण हे जखमी तरुणांसोबत सेल्फी काढत होते. जखमी तरुण हे मदतीसाठी याचना करत होते पण लोकांनी सेल्फी काढण्यात धन्यता मानली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2018 10:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...