फिल्मी स्टाईलने प्रेमी युगुलाची आत्महत्या, एकमेकांच्या डोक्यात घातल्या गोळ्या

फिल्मी स्टाईलने प्रेमी युगुलाची आत्महत्या, एकमेकांच्या डोक्यात घातल्या गोळ्या

आत्महत्या करत्यावेळी या दोघांनी फोटो काढले. या फोटोमध्ये घटनास्थळी बिअरच्या बाटल्या आणि सिगारेटही पडलेल्या आहेत.

  • Share this:

बाडमेर (राजस्थान)13 जून : आंतरजातीय विवाहास नकार दिल्यामुळे तरुणांनी आत्महत्या केल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या असतील. याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रेमी युगुलानी एकमेकांच्या डोक्यावर बंदूक ठेवत आत्महत्या केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. शंकर आणि अंजू अशी अशी आत्महत्या केलेल्या तरुणांची नावं आहेत. प्रेमविवाहास नकार दिल्यामुळे या दोघांनीही आत्महत्या केली अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शंकर आणि अंजूने एकमेकांना गोळी घातली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पण त्यांच्या प्रेमाला घरच्यांकडून नकार देण्यात आला. त्यामुळे या दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

घरच्यांनी नकार दिल्यानंतर बुधवारी रात्री अंजू आणि शंकर घरातून फरार झाले. त्यानंतर गुरुवारी सकाळी दोघांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातला हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बाडमेर जिल्ह्यातल्या चौहटन पोलीस ठाणे क्षेत्रातील लीलसर गावात या प्रेमी जोड्याने आत्महत्या केली आहे.

शंकर आणि अंजूने गावठी कट्ट्याने एकमेकांना गोळी घातली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा : टिकटॉकवर बंदूक घेऊन करत होते व्हिडिओ, गोळी सुटली आणि 'खेळ' संपला!

या जोडप्याकडे गावठी कट्टा नेमका कसा आला याचा पोलीस शोध घेत असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी शंकर आणि अंजूच्या घरी या प्रकाराची माहिती दिली असून त्यांचीही चौकशी पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

दरम्यान, आत्महत्या करत्यावेळी या दोघांनी फोटो काढले. या फोटोमध्ये घटनास्थळी बिअरच्या बाटल्या आणि सिगारेटही पडलेल्या आहेत. या सगळ्या वस्तू पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

महिलेला रस्त्यावर पाडून चाबकाने बेदम मारहाण, VIDEO समोर

First published: June 13, 2019, 3:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading