पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार जसोदाबेन यांची भूमिका

पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार जसोदाबेन यांची भूमिका

आतापर्यंत विवेक सोडून इतर कलाकार सिनेमात कोणती भूमिका करणार हे सांगण्यात आले नव्हते. पंतप्रधानांच्या पत्नी जसोदाबेन यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार याबद्दल अनेकांमध्ये उत्सुकता होती

  • Share this:

मुंबई, ११ फेब्रुवारी २०१९- अगदी काही दिवसांमध्येच राजकीय नेत्यांवर दोन सिनेमे प्रदर्शित झाले. प्रेक्षकांनी या दोन्ही सिनेमांना पसंती दिली. पहिल्यांदा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ सिनेमा प्रदर्शित झाला तर नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक ‘ठाकरे’ही लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. आता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक येऊ घातला आहे.

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान मोदींची व्यक्तिरेखा साकारत आहे. आतापर्यंत विवेक सोडून इतर कलाकार कोणती भूमिका करणार हे सांगण्यात आले नव्हते. पंतप्रधानांच्या पत्नी जसोदाबेन यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार याबद्दल अनेकांमध्ये उत्सुकता होती.

View this post on Instagram

Wind beneath my wings .... @indraneilsengupta ❤️

A post shared by Barkha Sengupta (@barkhasengupta) on

असा अंदाद वर्तवला जात आहे की जसोदाबेन यांची भूमिका टीव्ही अभिनेत्री बरखा बिष्ट साकारणार आहे. याबद्दल बोलताना बरखा म्हणाली की, ‘या सिनेमासाठी आम्ही अहमदाबादमध्ये चित्रीकरण करणाऱ आहोत आणि यासंदर्भात मी अनेक गोष्टी वाचायला सुरुवात केली आहे. इतर भूमिकांसारखी ही भूमिका नाही. यासाठी योग्य अभ्यासाची गरज आहे, कारण जसोदाबेन यांच्याबद्दल अनेकांना फारसं काही माहीत नाही.’

बरखासाठी अहमदाबाद हे शहर काही नवीन नाही. कारण तिचा नवरा अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता हा अहमदाबादचा राहणारा आहे. या शहराबद्दल बोलताना बरखा म्हणाली की, ‘अहमदाबाद माझ्यासाठी नवीन नक्कीच नाही. मी अनेकदा इथे येऊन गेले आहे. मला या भूमिकेसाठी गुजरातीमध्ये बोलायला शिकायला हवं. या व्यक्तीरेखेचे अनेक अंग आहेत, प्रेक्षकांनी ही व्यक्तिरेखा नक्कीच आवडेल. मी आता फक्त एवढंच सांगू शकते की या सिनेमाशी जोडलं गेल्याचा मला अभिमान आहे.’

VIDEO : स्वित्झर्लंड नव्हे, हे आहे आपलं शिमला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 01:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading