बारगर्ल निशाचा खून तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरानेच केल्याचं उघड

बारगर्ल निशाचा खून तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरानेच केल्याचं उघड

मुंबईतल्या एका बारगर्ल्सच्या हत्येचा उलगडा झालाय. ज्योती उर्फ निशा हिची तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर प्रितेश लाव यानं हत्या केलीय.

  • Share this:

03 जानेवारी, मुंबई : मुंबईतल्या एका बारगर्ल्सच्या हत्येचा उलगडा झालाय. ज्योती उर्फ निशा हिची तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर प्रितेश लाव यानं हत्या केलीय. निशानं मुंबईतल्या सर्वात मोठ्या बारमध्ये काम केलं होतं. काशीमिरातल्या नाईटसिटी नावाच्या बारचं मुख्य आकर्षण म्हणून निशाचं नाव होतं.

सूरत शहराजवळच्या टिंबा नावाच्या गावात निशाला प्रितेशनं बोलावलं होतं. तिथल्या फार्महाऊसमधील केळीच्या बागेत तिची हत्या केली. निशाचा मृतदेह सापडला असून तिचं शिर गायब आहे. पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली असून अटकेमागं प्रेमाचा त्रिकोण असल्याचं सांगण्यात येतंय.

First published: January 3, 2018, 10:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading