RBI चा 'बँक ऑफ महाराष्ट्र'ला दणका, तोटा भरून काढण्याचा प्रस्ताव रद्द

RBI चा 'बँक ऑफ महाराष्ट्र'ला दणका, तोटा भरून काढण्याचा प्रस्ताव रद्द

'बँक ऑफ महाराष्ट्र' ला झालेला तोटा शेअर प्रिमियम अकाउंट आणि रेव्हेन्यू रिझर्व्ह अकाउंटमधल्या गंगाजळीतून हा तोटा भरून काढता येईल, असं बँकेचं म्हणणं होतं. पण रिझर्व्ह बँकेने ते मान्य केलं नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ महाराष्ट्र ला दणका दिला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रला जे 7 हजार 360 कोटींचं नुकसान झालं ती तूट आरक्षित धनाने भरून काढण्याचा बँकेचा प्रस्ताव होता. पण हा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने फेटाळला.

शेअर प्रिमियम अकाउंट आणि रेव्हेन्यू रिझर्व्ह अकाउंटमधल्या गंगाजळीतून हा तोटा भरून काढता येईल, असं बँकेचं म्हणणं होतं. पण रिझर्व्ह बँकेने ते मान्य केलं नाही. बँक ऑफ महाराष्ट्रने शेअर बाजारात पाठवलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने 27 सप्टेंबरला पत्र पाठवून हा प्रस्ताव रद्द केल्याची माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर 2 टक्क्यांनी खाली येऊन 10. 80 रुपयांवर बंद झाला.

PMC बँकेवर निर्बंध

रिझर्व्ह बँकेने 23 सप्टेंबरलाच PMC बँकेच्या व्यवहारांवर 6 महिन्यांसाठी निर्बंध घातले. या बँकेच्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे बँकेच्या संचालकांनाही अटक करण्यात आली आहे. पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने 6 महिन्यांसाठी निर्बंध घातले. या बँकेच्या खातेदारांची खाती गोठवण्यात आली.त्याआधी, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते.बँकेतल्या व्यवहारात पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचं सांगत 6 महिने सर्व व्यवहारांवर निर्बंध घातल्याचं RBIने पत्रात म्हटलं होतं.

================================================================================

VIDEO :...तर आश्चर्य वाटू देऊ नका, पवार कुटुंबाबद्दल चंद्रकांत पाटलांचं भाकीत

Published by: Arti Kulkarni
First published: October 9, 2019, 9:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading