Bank Holiday: आजपासून सलग 4 दिवस बँका बंद; जाणून घ्या पूर्ण यादी

Bank Holiday: आजपासून सलग 4 दिवस बँका बंद; जाणून घ्या पूर्ण यादी

रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीत एप्रिल महिन्यात एकूण 15 दिवस सुट्ट्या असणार आहेत. पण सर्व राज्यात बँकाना एकसमान सुट्ट्या नाहीत. कारण काही सण किंवा उत्सव संपूर्ण देशात एकाच दिवशी साजरा केला केला जात नाही. RBI वेबसाइटवरील माहितीनुसार, एप्रिल महिन्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये 15 दिवस बँका बंद राहणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 एप्रिल: आजपासून (13 एप्रिल) देशात सलग 4 दिवस बँका बंद (Banks will remain closed for 4 consecutive days from April 13) राहणार आहेत. त्यामुळे जर बँकेत काही महत्त्वाची कामं प्रलंबित असतील, तर तुम्हाला थेट शनिवारी (17 एप्रिल) रोजी करावं लागणार आहे. कारण विविध सण आणि उत्सवामुळे देशातील बॅंका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. खरंतर एप्रिलमध्ये एकूण 9 दिवस बँका बंद राहणार आहेत. तर या आठवड्यात बँका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत जर तुमची कामं रखडली असतील तर तुम्हाला आता चार दिवस वाट पाहण्या व्यतिरिक्त अन्य पर्याय नाही. कोणत्या दिवशी बॅंका बंद राहणार याची यादी आरबीआयकडून प्रसिद्ध केली जाते. जाणून घ्या या महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहणार...

सर्व राज्यांत एकसमान नियम नाहीत

रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीत एप्रिल महिन्यात एकूण 15 दिवस सुट्ट्या असणार आहेत. पण सर्व राज्यात बँकाना एकसमान सुट्ट्या नाहीत. कारण काही सण किंवा उत्सव संपूर्ण देशात एकाच दिवशी साजरा केला केला जात नाही. आरबीआयच्या वेबसाइटवरील उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल महिन्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये  15 दिवस बँका बंद राहणार आहेत.

बँकेच्या सुट्ट्यांची यादी

- 13 एप्रिल - मंगळवार - उगाडी, तेलगू नवीन वर्ष, बोहाग बिहू, गुढी पाडवा, बैसाखी, बिजू महोत्सव (बेलापूर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इम्फाल, जम्मू, मुंबई, नागपूर, श्रीनगर याठिकाणी सुट्टी)

- 14 एप्रिल - बुधवार - डॉ. आंबेडकर जयंती, सम्राट अशोका जन्मदिन, तमिळ नवीन वर्ष, महा विशुबा संक्रांती, बोहाग बिहू (एजॉल, भोपाळ, चंदीगड, नवी दिल्ली, रायपूर, शिलाँग आणि शिमला या ठिकाणी बँका खुल्या राहणार)

- 15 एप्रिल - गुरुवार - हिमाचल दिन, विशु, बंगाली नवीन वर्ष, सरहुल (अगरतळा, गुवाहाटी, कोलकाता, रांची, शिमला येथे सुट्टी)

- 16 एप्रिल - शुक्रवार - बोहाग बिहू (गुवाहाटीमध्ये बँका बंद)

- 18 एप्रिल - रविवार (साप्ताहिक सुट्टी)

- 21 एप्रिल - बुधवार - राम नवमी, गारिया पूजा (अगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, पाटणा, रांची आणि शिमला येथे बँका बंद)

- 24 एप्रिल - चौथा शनिवार (सर्व ठिकाणी बँका बंद)

- 25 एप्रिल - रविवार - महावीर जयंती

(वाचा-खात्यात पैसे नसले, तरीही ही बॅंक देईल 3 लाखांचा ओव्हरड्राफ्ट; फक्त आहे एकच अट)

सणांमुळे बँका राहणार बंद

तेलुगू नववर्ष, बिहू, गुढी पाडवा, बैसाखी, बिजू महोत्सव आणि उगाडी या सणानिमित्त 13 एप्रिल रोजी बँकेला सुट्टी असेल. तर दुसर्‍या दिवशी म्हणजेच 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बँका बंद असतील. त्यानंतर 15 एप्रिल रोजी हिमाचल दिन, विशु, बंगाली नववर्ष, सरहुल निमित्त काही राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे. यानंतर 21 एप्रिलला रामनवमी आणि 25 एप्रिलला महावीर जयंतीची सुट्टी असेल. तसंच 24 एप्रिल रोजी चौथा शनिवार असल्यानं त्या दिवशीही सुट्टी असणार आहे.

Published by: News18 Desk
First published: April 13, 2021, 9:11 AM IST

ताज्या बातम्या