WORLD CUP : 'बांगला टायगर'ची 5 व्या स्थानावर उडी, अफगानिस्तानवर 62 धावांनी विजय

WORLD CUP : 'बांगला टायगर'ची 5 व्या स्थानावर उडी, अफगानिस्तानवर 62 धावांनी विजय

बांगलादेशच्या टीमने आज पुन्हा एकदा वाघाची डरकाळी फोडत अफगानिस्तानवर विजय मिळवला आहे.

  • Share this:

लंडन, 24 जून : बांगलादेशच्या टीमने आज पुन्हा एकदा वाघाची डरकाळी फोडत अफगानिस्तानवर विजय मिळवला आहे. बांगला सेनेनं अफगान संघाला 62 धावांनी पराभूत केलं आहे.

पहिले फलंदाजी करत बांगलादेशाने निर्धारित 50 षटकात 7 बाद 262 धावांचा स्कोअर उभारला होता. याला उत्तर देत अफगानी संघ अवघ्या 200 धावांवर गारद झाला. बांगलादेशने आज आपला 7 वा सामना खेळला असून 3 विजय मिळवलाआहे. या विजयासह बांगलादेशने 5 क्रमांकावर झेप घेतली आहे. तर दुसरीकडे अफगान संघ संपूर्ण सातही सामने पराभूत झाला आहे.

बांगलादेश संघाकडून मुश्फिकुर रहीमने सर्वाधिक 83 धावा केल्यात. शाकिब अल हसन 51 , सौम्य सरकार 3, तमीम इकबाल 36 आणि लिट्टन दास 16 धावा करून माघारी परतले. तर महमदुल्‍लाहने 27 धावा केल्यात. अफगानिस्तान संघाकडून मुजीब उर रहमानने 3, नईबने 2 आणि दौलत जादरान-नबीने 1-1 गडी बाद केले.

262 धावांचा पाठलाग करणाऱ्या अफगान संघाची सुरुवात सावध राहिली. परंतु, 24 धावा करून रहमत शाह बाद झाला. 79 धावा करून हशमतुल्लाह शाहिदी 11 धावांवर बाद झाला. अफगान संघाचा 100 धावांवर झाल्यानंतर कर्णधार गुलबदीन नईब 47 धावा करून बाद झाला. त्यानंतर एकापाठोपाठ गडी बाद होत गेले. अवघा संघ 47 व्या षटकात गारद झाला.

===================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2019 10:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading