News18 Lokmat

'पश्चिम बंगाल'चं नामकरण, आता फक्त 'बांग्ला' म्हणायचं!

कलकत्त्याचं कोलकता केल्यानंतर पश्चिम बंगाल चं नाव बदलून आला फक्त 'बांग्ला' होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2018 04:54 PM IST

'पश्चिम बंगाल'चं नामकरण, आता फक्त 'बांग्ला' म्हणायचं!

कोलकता,ता.26 जुलै : कलकत्त्याचं कोलकता केल्यानंतर पश्चिम बंगाल चं नाव बदलून आला फक्त 'बांग्ला' होणार आहे. पश्चिम बंगलाच्या विधानसभेने हा प्रस्ताव मंजूर केला असून तो आता केंद्र सरकारच्या मंजूरीसाठी पाठवला जाणार आहे. राज्याचे मंत्री पार्था चॅटर्जी यांनी विधानसभेत हा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाल काँग्रेस आणि डाव्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारनं मंजूरी दिल्यानंतर राज्य सरकार नव्या नावाची अधिसूचना काढणार आहे.

2016 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने तीन नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. बंगाली भाषिकांसाठी बांग्ला, हिंदी साठी 'बंगाल' आणि इंग्रजी भाषिकांसाठी 'बंगाली' अशी ती तीन नावं होती. मात्र केंद्र सरकारने तो प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यामुळे राज्य सरकारने आता फक्त 'बांग्ला' हे नाव मंजूर केलं आहे.

असा होता कारगिल युद्धाचा घटनाक्रम, सर्वस्व पणाला लावून पाकचा केला होता पराभव

पैसे बुडवून विदेशात पळणाऱ्यांची आता खैर नाही, नव्या कायद्याला मंजूरी

बांग्ला अस्मितेशी स्वत:ला जोडून घेण्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या यशस्वी झाल्या आहेत. त्याचच एक पुढचं पाऊल म्हणजे हे नामकरण असल्याचं बोललं जात आहे. तृणमूल काँग्रेसने सातत्याने बांग्ला अस्मितेचा पुरस्कार केला. आपणच राज्याच्या अस्मितेचे खंदे संरक्षणकर्ते आहोत ही प्रतिमा खोलवर रूजवण्यासाठीच हा प्रयत्न असल्याचं राजकीय निरीक्षकाचं मत आहे.

Loading...

PHOTOS: मुंबईसारखीच दिल्लीही तुंबली

सुशांत सिंग आणि कृती सेनाॅननं रिलेशनशिपमध्ये घेतला ब्रेक, कारण..

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...