Elec-widget

RSS कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, गरोदर पत्नी आणि मुलाचाही केला खून

RSS कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, गरोदर पत्नी आणि मुलाचाही केला खून

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ माजली आहे. बंधुप्रकाश पाल या नावाच्या इसमाची त्याची पत्नी आणि 8 वर्षांच्या मुलासोबत हत्या करण्यात आली.

  • Share this:

मुर्शिदाबाद, 10 ऑक्टोबर : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ माजली आहे. बंधुप्रकाश पाल या नावाच्या इसमाची त्याची गर्भवती पत्नी आणि 8 वर्षांच्या मुलासोबत हत्या करण्यात आली. बंधुप्रकाश पाल हा आमचा कार्यकर्ता आहे,असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे.

पश्चिम बंगालच्या काजीगंज भागात ही घटना घडली. RSS ने बंधुप्रकाश पाल हा संघाचा स्वयंसेवक असल्याचा दावा केल्यानंतर एकच खळबळ माजली. बंधुप्रकाश पाल हे RSS च्या मेळाव्यामध्येही सहभागी झाले होते, असंही RSS चं म्हणणं आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव जिस्नु बसु म्हणाले, सुरुवातीला आम्हाला वाटत होतं, या प्रकरणाचा छडा लावला जाईल, ही राजकीय हत्या नाही पण पोलीस या घटनेचा छडा लावू शकले नाहीत.

भाजप नेत्यांची हत्या

याआधी, उत्तर प्रदेशातल्या बस्ती जिल्ह्यात बुधवारी भाजपच्या एका नेत्याची हत्या करण्यात आली होती. हत्येच्या या घटनेनंतर बस्तीमघ्ये आगडोंब उसळला. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला.

उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरमध्ये देवबंद भागातही भाजपच्या नेत्याची हत्या करण्यात आली. या नेत्याला दिवसाढवळ्या गोळ्या घालण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ माजली होती.

Loading...

यशपाल सिंह असं या भाजपच्या नेत्याचं नाव आहे.यशपाल सिंह देवबंदहून मिरगपूरला चालले होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्यांना गोळी घातली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू ओढवला. घटना घडल्याच्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला.

==========================================================================================

VIDEO :ट्रक घेतल्यावर लिंबू मिरची लावताना पाहिलं, शरद पवारांचा गृहमंत्र्यांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 06:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...