News18 Lokmat

पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेवर बंदी घालावी, विखे पाटलांची मागणी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण होऊनही अजून त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत, मात्र याबाबत सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2018 10:38 AM IST

पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेवर बंदी घालावी, विखे पाटलांची मागणी

कोल्हापूर, 31 ऑगस्ट : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण होऊनही अजून त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत, मात्र याबाबत सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये कॉम्रेड पानसरे यांच्या घरी जाऊन विखे पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी उमा पानसरे आणि मेघा पानसरे यांच्याशी चर्चा केली आणि सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. सर्व पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकला पाहिजेत असेही विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

'सनातन' नामक संस्थेने पानसरे, दाभोलकर, लंकेश, कलबुर्गी मंडळींचे खून केले व त्याबद्दल या संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मग तशी बंदी आधीच घालून सरकारने या सर्व मंडळींना जेरबंद का केले नाही, हा प्रश्न आहेच. आता जे लोक पकडले ते सर्व ‘सनातन’चे असल्याचे बोलले गेले, पण यापैकी एकही व्यक्ती आमची साधक नाही, असल्यास सिद्ध करा असे आव्हान ‘सनातन’च्याच मंडळींनी दिले आहे. त्यामुळे नेमके सत्य काय आहे याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या तरी ‘एटीएस’ सांगेल तेच खरे असे मान्य करावे लागत आहे.

पुन्हा या सर्व मंडळींना अनेक प्रमुख व्यक्तींना उडवायचे होते, असेही सांगितले जात आहे. आता या प्रमुख व्यक्ती कोण, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. दरम्यानच्या काळात पंतप्रधान मोदी यांच्याही जीवाला धोका आहे आणि तसा कट रचला जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याची संशयाची सुई माओवाद्यांकडे असल्याने माओवादी लोकांवर धाडी पडल्या. अर्थात माओवाद्यांकडे फक्त धमक्यांची पत्रे व कागदपत्रे सापडली, पण हिंदुत्ववाद्यांकडे मात्र बॉम्ब, बंदुका, स्फोटके सापडली.

पुन्हा जे नक्षलवादी समर्थक मान्यवर आता पकडले गेले आहेत त्यांना ‘कथित’ नक्षलवादी समर्थक म्हटले जात आहे आणि अटकेत असलेल्या हिंदुत्ववादींचा उल्लेख मात्र थेट ‘हिंदू कट्टरपंथीय’ असा केला जात आहे. मुळात पानसरे, दाभोलकर, लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्येमागे समान धागा आहे काय हे सिद्ध व्हायचे आहे.

यापैकी प्रत्येक जण स्वतंत्र विचारांचा होता व हे सर्व लोक कम्युनिस्ट किंवा समाजवादी विचारसरणीचे होते. प्रत्येकाची हत्या हा स्वतंत्र कट असू शकतो. यापूर्वी समीर गायकवाड नामक तरुणास पानसरे हत्या प्रकरणात पकडण्यात आले. त्याच्यावर आरोपपत्रही दाखल केले गेले.

Loading...

 

VIDEO : समुद्रात बुडणाऱ्या महिलेला सफाई कर्मचाऱ्यांनी वाचवलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2018 10:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...