डेटा आॅपरेटरचा प्रताप, मतदार यादीत लावला सनी लिओनचा बिकनीतला फोटो!

डेटा आॅपरेटरचा प्रताप, मतदार यादीत लावला सनी लिओनचा बिकनीतला फोटो!

एवढंच नाहीतर मतदान यादीत कबूतर आणि हरिणीचाही समावेश आहे.

  • Share this:

 

उत्तर प्रदेश, 25 आॅगस्ट : उत्तरप्रदेशमधील बलिया इथं एक धक्कादाक घटना समोर आलीये. मतदान यादीत चक्क बाॅलिवूड अभिनेत्री सनी लिओनचा समावेश करण्यात आलाय. एवढंच नाहीतर मतदान यादीत कबूतर आणि हरिणीचाही समावेश आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर मतदान कार्ड तयार करणाऱ्या आॅपरेटरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

उत्तरप्रदेशमध्ये मतदान ओळखपत्राचे काम सुरू आहे. या दरम्यान मतदान यादी मोठा घोळ समोर आला. मतदाराच्या समोर प्राण्याचे फोटो लावण्यात आले आहे. एवढंच नाहीतर एका मतदाराच्या समोर सनी लिओनचा आक्षेपार्ह फोटो लावण्यात आलाय. माहिती समोर आल्यानंतर निवडणूक कार्यालयात एकच खळबळ उडाली.

मतदान यादी लिक झाली असून या यादीत एका 51 वर्षीय महिलेच्या फोटोऐवजी सनी लिओनचा फोटो लावण्यात आलाय. तर एका 56 वर्षीय पुरुषाच्या फोटोच्या ऐवजी हत्तीचा फोटो लावण्यात आलाय.

निवडणूक अधिकारी मनोज कुमार सिंघल यांना याबद्दल विचारणा केली असता, डाटा आॅपरेटर विष्णु नावाच्या व्यक्तीने हा घोळ केल्याचं त्यांनी सांगितलं. विष्णुला अलीकडे ग्रामीण भागात पाठवण्यात आलं होतं. हा प्रकार समोर आल्यानंतर विष्णुच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीये. ज्या मतदारांच्यासमोर चुकीचे फोटो लावले होते ते बदलण्याचं काम सुरू आहे.

विशेष म्हणजे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच मतदान ओळखपत्राचे काम सुरू झाले आहे. स्थानिक डेटा आॅपरेटरकडून नाव आणि फोटोचा डेटा गोळा केला जातो. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी त्याला मंजुरी देत असतात. सध्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहे.

First published: August 25, 2018, 7:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading