आत्मनिर्भर म्हणजे, तुमचे तुम्ही पाहा; काँग्रेस नेत्यांची मोदींवर सडकून टीका

आत्मनिर्भर म्हणजे, तुमचे तुम्ही पाहा; काँग्रेस नेत्यांची मोदींवर सडकून टीका

'महाराष्ट्र सगळ्यात जास्त महसूल देतो तेव्हा सगळ्यात जास्त मदत राज्याला मिळाली पाहिजे'

  • Share this:

मुंबई, 13 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी 20 लाख कोटी पॅकेजची घोषणा केली आहे. त्यांच्या या भूमिकेवर काँग्रेस नेत्यांनी सडकून टीका केली आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही 'आत्मनिर्भर म्हणजे, तुमचे तुम्ही पाहा' असं म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे.

'महाराष्ट्र सगळ्यात जास्त महसूल देतो तेव्हा सगळ्यात जास्त मदत राज्याला मिळाली पाहिजे म्हणून  केंद्र सरकारनं महाराष्ट्राला विशेष पॅकेज देण्याची घोषणा करावी', अशी मागणीही बाळासाहेब थोरात यांनी केली.

'पंतप्रधान मोदींनी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. पण  मुळात नरेंद्र मोदी हे स्वप्न दाखवण्यात तरबेज आहेत. आत्मनिर्भर म्हणजे, तुमचे तुम्ही पाहा असा त्याचा अर्थ होत आहे', असा टोलाही थोरात यांनी लगावला.

हेही वाचा - झिंक आणि गरम पाण्याने कोरोना रुग्णांना बरं केलं; मंगळुरूच्या डॉक्टरांचा दावा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना जवळपास 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.  आज  संध्याकाळी  देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पॅकेजबद्दल सविस्तर माहिती देणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची आज 4 वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये  सर्वसामान्य नागरिक,शेतकरी, कामगार व्यापारी, उद्योजक यांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 13, 2020, 1:33 PM IST

ताज्या बातम्या