आमची भेटच सकारात्मक आहे, उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

आमची भेटच सकारात्मक आहे, उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

बैठक संपल्यानंतर बाळासाहेब थारोत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आधी निर्णय घेईल आणि नंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करू असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. पण कालच्या पार्श्वभूमिवर ही सदिच्छा भेट असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेत थारोत यांनी दिली आहे. बैठक संपल्यानंतर बाळासाहेब थारोत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आधी निर्णय घेईल आणि नंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करू असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. शरद पवारांसोबत आधी एकत्र बसून चर्चा करणार, महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर बोलून त्यानंतर शिवसेनेशी सकारात्मक चर्चा होणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

काँग्रेसची आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही सकारात्मक आहे. त्यामुळे यापुढे सकारात्मरक चर्चा करू असे स्पष्ट संकेत यावेळी काँग्रेसकडून देण्यात आले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत फक्त सदिच्छा भेट, आवश्यकता वाटल्यास सेनेसोबत पुन्हा चर्चा करू असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यातून जागावाटपाचा काय फॉर्म्युला समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तेचं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेसोबतच्या सत्तावाटपाबाबत चर्चा तर झालीच शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

'आमदारांनी आता आपल्या मतदारसंघात जाऊन कामाला सुरुवात करावी. अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे, त्याबाबत त्यांना दिलासा देण्याचं काम करावं. आपण ज्या मतदारसंघात निवडणूक जिंकली आहे तिथं जाऊन नेत्यांनी आभार दौरे करावेत,' अशा सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांना केल्या आहेत.

'मध्यावधी होणार नाही'

महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरतेचं चित्र आहे. राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निवडणुका होणार का, याची चर्चा जोर धरू लागली आहे. नव्याने निवडून आलेल्या आमदारांच्या मनातही हीच भीती आहे. याबाबत शरद पवारांनी आमदारांच्या बैठकीत भाष्य केल्याची माहिती आहे. 'आमदारांनी चिंता करू नये. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होणार नाही,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सत्तावाटपात नवा ट्विस्ट

भाजपसमोर सत्तावाटप करताना शिवसेनेनं 50-50 चा फॉर्म्युला ठेवला होता. आता तोच फॉर्म्युला राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर ठेवला आहे. राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या मागणीला शिवसेना कसा प्रतिसाद देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'शिवसेनेपेक्षा आमचे केवळ दोन आमदार कमी आहेत. त्यामुळे अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदासाठीचा आमचा दावा चुकीचा नाही,' असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा तर नंतरची अडीच वर्ष राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 13, 2019, 3:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading