राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, थोरातांची एकनाथ खडसेंना ऑफर, पण...

राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, थोरातांची एकनाथ खडसेंना ऑफर, पण...

एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी काँग्रेसकडून ऑफर होती, असा दावा केला होता.

  • Share this:

मुंबई, 13 मे : विधान परिषद निवडणुकीवरून भाजपमध्ये अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे कमालीचे नाराज झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ खडसे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारली हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असेल. पण,  लोकनेता, बहुजनांचा नेता दूर ठेवणे हा संघाचा विचार आहे. त्यामुळेच  खडसेंना उमेदवारी दिली नसेल अशी टीका थोरात यांनी केली.

एकनाथ खडसे यांनी काँग्रेसकडून ऑफर देण्यात आल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर भाष्य करत थोरात म्हणाले की, ' नाथाभाऊ म्हणाले की मी त्यांना संपर्क केला होता. तसं बघायला गेलं तर ते माझे जुने मित्र आहेत. आम्ही 1990 पासून विधानसभेत एकत्र आहोत.  जनमानस असलेला नेता आहे' अशा शब्दात थोरात यांनी कौतुक केलं.

हेही वाचा - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, बहुजन विकास आघाडीच्या नेत्याचा मृत्यू

तसंच, जर काँग्रेसचे विचार स्विकारून ते आमच्या सोबत येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू' अशी ऑफरच थोरात यांनी खडसेंना दिली आहे.

एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी काँग्रेसकडून ऑफर होती, असा दावा केला होता. त्यांच्या विधानावर आज थोरात यांनी थेट ऑफरच देऊन टाकली आहे. याआधीही एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. परंतु, खडसेंनी आपण भाजपमध्ये असणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु, आता विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यामुळे खडसे प्रचंड दुखावले गेले आहे.

एकनाथ खडसेंचा उमेदवारीवरून खुलासा

दरम्यान,  एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा पक्षातील नेत्यांबद्दल आपली खदखद बोलून दाखवली. 'विधान परिषद निवडणुकीसाठी माझ्यासह, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची शिफारस केली होती. तसंच आमची शिफारस केल्याचंही राज्यातील भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं. पण, आम्हाला डावलून भारतीय जनता पक्षाकडून  4 नव्या उमेदवारांनी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केले' असा दावा खडसेंनी केला.

हेही वाचा - मोठी बातमी! एक-दोन दिवसात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता, असणार हे 10 नियम

तसंच, 'ज्या लोकांनी  फॉर्म भरला ते सकाळी हजर होते इतक्या कमी वेळात ते कसे हजर झाले? त्यांचे कागदपत्र पाहिले तर मार्च महिन्यात मध्येच त्यांची कागदपत्र जमवलेली होती. त्यांना यापूर्वीच तुमचे तिकीटं फायनल आहे असं सांगण्यात आलं होतं. जर असं होतं तर आमची शिफारस केली, असं सांगण्याची गरजच नव्हती. भाजपच्या संसदीय बोर्डाकडे फक्त आमच्या नावाची शिफारस केली होती, या चार उमेदवारांची नाव पाठवली नव्हती, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला.

तसंच, कोथरूडमधून मेधा कुलकर्णी यांचा राजीनामा घेऊन चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी पाटील यांनी त्यांना विधान परिषदेचं तिकीट देणार असं आश्वासन दिलं होतं. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून कुलकर्णी यांना उमेदवारी द्यायला हवी होती, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

संपादन - सचिन साळवे

First published: May 13, 2020, 3:00 PM IST

ताज्या बातम्या