कृषी विधेयकावरून महाविकास आघाडीत पडसाद, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कृषी विधेयकावरून महाविकास आघाडीत पडसाद, बाळासाहेब थोरात म्हणाले...

सभागृहामध्ये बहुमताचा आकडा असल्याने हुकूमशाही पद्धतीने विधेयक केंद्र सरकार मंजूर करत असल्याचा टीका देखील थोरात यांनी यावेळी केली.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : कृषी विधेयकावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद पेटला आहे. आता त्याचे पडसाद महाविकास आघाडीमध्येही पाहण्यास मिळत आहे. 'शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना कृषीविषयक विधेयकाला विरोध का केला नाही याची विचारणा काँग्रेस करणार आहे.

दोन दिवसांआधी दिल्लीत झालेल्या अधिवेशनात कृषी विषयक विधेयक मांडण्यात आले आणि मंजूर करण्यात आले. पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गैरहजर होते. तर यावेळी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शिवसेनेनं विरोध केला नाही. याचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. या विधेयकाला काँग्रेसचा विरोध कायम आहे. हे विधेयक शेतकरी वर्गाची मुंडी तोडणारे आहे तर व्यापार्‍यांना फायदा करणार्‍या विधेयकाला काँग्रेस विरोध करत आहे पक्षांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांसाठी या विधेयकाला विरोध करणं गरजेचं आहे, असं थोरात यांनी म्हटलं आहे.

'महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी या विधेयकाला विरोध का केला नाही. याचे तेच उत्तर देतील,  काँग्रेस पक्ष देखील या संदर्भात विचारणा करेल. आम्ही आमची भूमिका या विधेयकाबाबत विरोधातील स्पष्ट मांडत आहे असे सांगत थोरात यांनी नाराजीचा सूर लावला आहे.

तसंच, 'सभागृहामध्ये बहुमताचा आकडा असल्याने हुकूमशाही पद्धतीने विधेयक केंद्र सरकार मंजूर करत असल्याचा टीका देखील थोरात यांनी यावेळी केली.

संसद भवनाच्या परिसरात 8 खासदारांचे आंदोलन सुरूच

दरम्यान,  राज्यसभेत कृषी विधेयक सादर करताना गोंधळ घातला म्हणून 8 खासदारांना निलंबित करण्यात आले. काँग्रेसच्या 8 ही खासदारांनी गांधीगिरी करत रात्रभर संसद भवनात ठिय्या मांडला आहे. अजूनही या खासदारांचे आंदोलन हे सुरूच आहे. तर उपसभापती हरिवंश सिंह यांनी एक दिवस उपवास करण्याची घोषणा केली आहे.

सभापतींच्या या कारवाईच्या निषेधार्थ सर्व खासदारांनी संसद भवनाच्या आवारात गांधी पुतळ्याजवळ कालपासून ठिय्या मांडला. रात्रभर सर्व खासदारांनी ठिय्या काही सोडला नाही. अखेर सकाळी खुद्द उपसभापतीच या आठही खासदारांना चहा घेऊन आले होते.

संसदेच्या परिसरात राज्यसभा सदस्य राजीव  सातव यांच्यासह काँग्रेसचे तीन, डाव्या पक्षाचे दोन, तृणमूल काँग्रेसचे दोन आणि आम आदमी पक्षाचे एक खासदार रात्रभर अशा आठ खासदारांनी संसद परिसरात ठिय्या मांडला. यात  डेरेक ओब्रायन, दोला सेन (तृणमूल), राजीव सातव, रिपून बोरा, सईद नासीर हुसेन (काँग्रेस), संजय सिंह (आप), के.के. रागेश, इल्लामारम करीम (CPI-M) यांचा समावेश आहे.

Published by: sachin Salve
First published: September 22, 2020, 12:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading