आजोबा बाळासाहेब ठाकरेंनी आदित्यला दिला होता कानमंत्र; ....गाडी स्लो चालवणेही योग्य नाही!

आजोबा बाळासाहेब ठाकरेंनी आदित्यला दिला होता कानमंत्र; ....गाडी स्लो चालवणेही योग्य नाही!

यापूर्वी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीने निवडणूक लढवली नव्हती. हेच कारण आहे की 1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेसाठी ही निवडणूक विशेष आहे.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : ठाकरे कुटुंबातील (Thackeray Family) तिसर्‍या पिढीतील सदस्य आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  हे मुंबईतील वरळी (Worli) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ठाकरे कुटुंबातील ते पहिले राजकीय नेते आहेत. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीने निवडणूक लढवली नव्हती. हेच कारण आहे की 1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेसाठी ही निवडणूक विशेष आहे. आदित्य जर निवडणूक लढवत असल्यामुळे त्याच्या नावाची बरीच चर्चा आहे. तर अनेकांनी आदित्य ठाकरेसंबंधी आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. अशीच एक घटना आहे जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला नातू आदित्य यांना राजकीय मंत्र दिला होता.

खरंतर आदित्य ठाकरे यांचा पहिला संगीत व्हिडिओ 2007 मध्ये लाँच झाला होता. या म्युझिक व्हिडिओमध्ये एकूण 8 गाणी होती आणि ती सर्व आदित्यने लिहिलेली आहेत. त्यावेळी ते फक्त 17 वर्षांचे होते. याच कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना एक राजकीय संदेश दिला होता. ते बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, 'वेगात गाडी चालवू नको. पण म्हणून हळू चालणंही योग्य नाही'

इतर बातम्या - राष्ट्रवादी सोडलेल्या आमदाराच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी पवार मैदानात

ज्येष्ठ गायकांनी गायली आदित्यने लिहिलेली गाणी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणारे आदित्य ठाकरे हे छायाचित्रकार, गीतकार आणि कवीदेखील आहेत. 2007 मध्ये लाँच झालेल्या म्युझिक व्हिडिओचं नाव 'उम्मीद' असं होतं. शंकर महादेवन, सुनिधी चौहान आणि कैलास खेर या ज्येष्ठ गायकांनी अल्बमची गाणी गायली. अमिताभ बच्चनदेखील या लॉन्च कार्यक्रमात उपस्थित होते.

इतर बातम्या - खळबळजनक! आईच्या लिव्ह-इन पार्टनरने केला 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्ये घट्ट नातं

आदित्य ठाकरे यांचं त्यांच्या आजोबांशी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अतिशय खास नातं होतं. खरंतर याची झलक तेव्हाच सगळ्यांना दिसली जेव्हा आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर मस्तक ठेऊन आशिर्वाद घेतला. त्याचा फोटो त्यांनी ट्वीटरवरही शेअर केला होता.

इतर बातम्या - पुणे हादरलं! 5 जणांनी धारदार शस्त्राने केले मित्रावर वार, तरुणाचा जागीच मृत्यू

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2019 12:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading