बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक मेअर बंगल्यात नाही, तर बंगल्याच्या तळघरात होणार

बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक मेअर बंगल्यात नाही, तर बंगल्याच्या तळघरात होणार

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आता महापौर बंगला परिसरात नाही तर निवासस्थानाच्या खाली अंडरग्राऊंड होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 04 सप्टेंबर : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आता महापौर बंगला परिसरात नाही तर निवासस्थानाच्या खाली अंडरग्राऊंड होणार आहे. यासाठी शिवसेनेने राज्य हेरीटेज विभागाला प्रस्ताव पाठवला होता आणि त्याला हेरीटेज विभागाकडून परवाणगी देण्यात आली आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कुठलिही तोडफोड किंवा येथील झाडांचीही कत्तल होणार नसल्याचे स्पष्ट आहे.

खरंतर या महापौर बंगल्याला एतिहासिक वारसा लाभला आहे. पुरातत्व विभागाकडून 'ब' दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे या भागात स्मारक बांधण्यासाठी जागा अपूरी पडत होती. त्यात बंगाल्याच्या परिसरात कोणताही बदल करणं शक्य नव्हत. त्यामुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील महापौर बंगल्याची वास्तू 2300 स्वेअर फूट एवढी असल्याने बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी वास्तूची जागा अपुरी पडते. तर अंडरग्राऊंड परिसर हा तब्बल 9000 स्वेअर फूटांवर पसरलेला आहे. त्यामुळे स्मारकासाठी अंडरग्राऊंड परिसराचा पुरेपूर वापर होईल आणि बंगला परिसरातील लॉन्सही अबाधित राहिल.

बाळासाहेबांचे स्मारक होण्यासाठी ऐतिहासिक वास्तूची मोडतोड केली जाऊ नये, अथवा बंगला परिसरातील झाडांचीही कत्तल होऊ नये, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची इच्छा असल्याचे पुरातत्व विभाग आणि संवर्धन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच या बंगल्यात आपण बाळासाहेबांनी काढलेले कार्टुन्स आणि त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवू, असेही उद्धव यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रस्तावाला सर्व पक्षीयांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आता स्मारकाचे बांधकाम कधी सुरू होणार याकडे सर्वाचं लक्ष आहे.

First published: September 4, 2018, 1:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading